उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला वाद अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही वारंवार दोन्ही भाऊ एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. ही गोष्ट राज ठाकरे यंदाच्या निवडणुकीत वारंवार बोलून दाखवताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात मात्र दोन्ही शिवसेनेचे उमेदवार मैदानात आहेत. यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडून गेल्या. याच निमित्ताने 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंबद्दल उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सविस्तर बोलले. उद्धव ठाकरे यांनी याविषयावर आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. माझ्यावर टीका करतात, खिल्ली उडवतात हे कसलं रक्ताचं नातं असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. (Uddhav Thackeray Exclusive Interview Mumbai Tak)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Raj Thackeray : अधिकाऱ्यांना काही कळतं की नाही? उद्धव ठाकरेंची बॅग चेक करण्यावरुन राज ठाकरे काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात जास्त चर्चा होतेय, ती दादर-माहिम मतदारसंघाची. या मतदारसंघात अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरे उमेदवार देतील की नाही यावर सर्वांचं लक्ष होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. हा सगळा विषय सुरू असतानाच राज ठाकरे हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना दिसत आहे. दोन्ही भावांमधील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून टोकाला पोहोचला आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे पहिल्यांदाच या विषयाबद्दल सविस्तर बोलले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत असलेल्या रक्ताचं नातं पाळत नाही असा आरोप केल्या जातो, त्यावर उद्धव ठाकरे व्यक्त झाले.
हे ही वाचा >>Sharad Pawar : "भूजबळांनी मर्यादा ओलांडल्या...", शरद पवारांनी दंड थोपटले, येवल्यात तुफान बरसले
उद्धव ठाकरे म्हणाले, "मी वडील आहे आणि मुलगा सुद्धा आहे. माझ्या वडिलांना झालेल्या यातना मी विसरू शकत नाही, त्यावेळी शिवसेना भवनावर जी दगडफेक झाली, ज्या शिवसैनिकांचं रक्त सांडलं, त्या शिवसैनिकांशी माझं रक्ताचं नातं आहे. ती दगडफेक कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. माझ्या शिवसैनिकांची डोकी फुटली होती. रक्ताचा सडा पडला होता, तेच शिवसैनिक माझ्या संकट काळात धावून येत आहेत. आज हे माझ्यावर टीका करतायत. माझ्याबद्दल, आदित्यबद्दल वाटेल ते बोलतायत. मी किंवा आदित्यने एकदाही वेडीवाकडी टीका केली नाही. तुम्ही माझी खिल्ली उडवत असाल. माझ्या आजरपणावर टीका केली, माझी चेष्टा केली, मग रक्ताचं नातं कोणतं? रक्ताचं नातं हे सगळीकडे जपलं पाहिजे, फक्त निवडणुकीच्या काळात उमेदवार न देणं एवढंच रक्ताचं नातं नसतं. इतर वेळी तुम्ही माझी खिल्ली उडवत असाल तर त्या रक्ताच्या नात्याला किंमत नाही" असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. अर्थातच राज ठाकरेंनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर घडलेल्या गोष्टींकडे उद्धव ठाकरे यांनी इशारा केला.
'मुंबई तक'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं सविस्तर मत मांडलं. विशेष म्हणजे आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंघाने आपल्या पक्षाची भूमिका मांडली.
उद्धव ठाकरेंची सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅननला भेट द्या.
ADVERTISEMENT