Sujay Vikhe-Patil : 'हे' आहे विखेंच्या सभेतील वादग्रस्त विधान... महायुतीला होणार नुकसान?

मुंबई तक

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 10:38 PM)

Sujay Vikhe-Patil, Vasant Deshmukh : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ येथे माजी खासदार, भाजप नेते, सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा झाली. या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत अश्लाघ्य असं विधान करण्यात आलं. सुजय विखेंचे समर्थक, भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल बोलताना पातळी सोडली.

vasant deshmukh offensive statement about jayashree thorat sangmner sujay vikhe patil mahayuti balasaheb thorat

वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल बोलताना पातळी सोडली.

follow google news

बातम्या हायलाइट

point

विखे-पाटलांच्या जाहीर सभेत एक अत्यंत वादग्रस्त विधान

point

जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत अश्लाघ्य विधान

point

ज्याचा फटका आता महायुतीला बसणार का?

Sujay Vikhe-Patil, Vasant Deshmukh : मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीची रणधुमाळी ही सुरु झाली आहे. पण याच दरम्यान, काल (25 ऑक्टोबर) सुजय विखे-पाटलांच्या जाहीर सभेत एक अत्यंत वादग्रस्त विधान करण्यात आलं. ज्याचा फटका आता महायुतीला बसणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (vasant deshmukh offensive statement about jayashree thorat sangmner sujay vikhe patil mahayuti balasaheb thorat) 

हे वाचलं का?

शुक्रवारी (25 ऑक्टोबर 2024) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ येथे माजी खासदार, भाजप नेते, सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा झाली. या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत अश्लाघ्य असं विधान करण्यात आलं. सुजय विखेंचे समर्थक, भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल बोलताना पातळी सोडली. 

हे ही वाचा : Manoj Jarange : ठाकरे-शिंदेंचा होणार करेक्ट कार्यक्रम? जरांगे म्हणाले, ''मुंबईतल्या 23 जागा पाडणार''

वसंतराव देशमुख बरळले, नेमकं 'ते' विधान काय? 

'त्यांची कोण ती.. नात काय ती.. बोलते ती म्हणतायत.. माझा सगळ्यांचा बाप.. माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे.. काय कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झालं प्रश्नय.. आपल्या कन्येला समजवा.. आपल्या कन्येला समजवा.. नाहीतर आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही.' 

'तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात.. बरोबर आहे.. त्यांची संस्कृती आहे ती पण दादा या ताईचं पराक्रम जर पाहिले ना.. सगळ्या तालुक्याला माहितीए..' असं अत्यंत विकृत विधान हे वसंतराव देशमुखांनी यावेळी केलं आहे. 

'त्या' विधानाचा महायुतीला बसणार फटका?

दरम्यान, वसंतराव देशमुख यांच्या याच विधानानंतर विरोधकांकडून महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. तसंच एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू असताना दुसरीकडे महिलांवर अशा प्रकारची टीका केली जात असल्याचं म्हणत विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे.

हे ही वाचा : Shiv Sena UBT : ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबीयांना दिला AB फॉर्म, पण उमेदवार ठेवला गुलदस्त्यात

राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीने आतापर्यंत वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. मात्र, महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्याचा निवडणुकीत जोरदार फटका बसू शकतो याची जाणीव होताच महायुतीच्या नेत्यांनी वसंतराव देशमुख प्रकरणी हात झटकले आहेत. 

वसंतराव देशमुखांवर कारवाई करण्यात येईल असंही भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण असं असलं तरी या मुद्द्यावरून आता विरोधकांनी याबाबत प्रचारात रान उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता याचा निवडणुकीत नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

संगमनेरमधलं वातावरण तापलं

दरम्यान, वसंतराव देशमुख यांच्यावर याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे वसंतराव यांच्या विधानानंतर काल रात्री काही जणांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीची तोडफोडही केली. ज्यानंतर याप्रकरणी विखेंकडून काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. 

सभा आटोपून परत जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या आणि त्यांची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आल्याचंही आता समोर आलं आहे.
 

    follow whatsapp