लहानपणी पतंग उडवणे हा प्रत्येकाचा आवडता छंद असतो. परंतू या पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या मांजामुळे अनेकांचे जीवही गेले आहेत. यासाठी नायलॉनच्या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. चंद्रपुरात एका लहान मुलाला कॉईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या कॉपरच्या वायरने पतंग उडवणं चांगलंच महागात पडलं आहे. पतंग उडवताना कॉपरच्या वायरचा विजवाहक तारांना स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का लागून मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
ADVERTISEMENT
चंद्रपूरमधील वरोरा शहरातील बोर्डा भागात ही घटना घडली आहे. आदित्य येटे असं या बालकाचं नाव असून या घटनेची माहिती मिळताच महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आदित्यवर सध्या चंद्रपुरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी या भागातला विजपुरवठा खंडीत करुन पंतग, कॉपरची तार आणि इतर साहित्य ताब्यात घेतलं आहे.
नागपूर : कारचा टायर फुटून भीषण अपघात, WCL च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घराबाहेर पडताना आपली मुलं नेमकं काय करत आहेत याकडे लक्ष ठेवणं पालकांसाठी गरजेचं बनलं आहे, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
ADVERTISEMENT