महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 634 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 28 हजार 535 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.1 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 9 हजार 195 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 252 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.1 टक्के इतका आहे. राज्यातला मृत्यूदर हा चिंतेचा विषय ठरतो आहे कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हा दर 2 किंवा 2.1 टक्के इतकाच राहिला आहे त्यापेक्षा तो कमी होताना दिसत नाही.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 18 लाख 75 हजार 217 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 70 हजार 599 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 285 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 4 हजार 339 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 16 हजार 667 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 9,195 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 60,70,599 झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 252 मृत्यूंपैकी 206 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 46 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
10 हजारांपेक्षा जास्त रूग्णसंख्या असलेले जिल्हे
मुंबई – 12 हजार 605
ठाणे- 16 हजार 105
पुणे- 17 हजार 86
सांगली- 10 हजार 382
कोल्हापूर- 12 हजार 495
महाराष्ट्रातले पाच जिल्हे अजूनही असे आहेत जिथे 10 हजारांहून जास्त सक्रिय रूग्ण आहेत. एकीकडे तिसऱ्या लाटेचा धोकाही संभवतो आहे. दुसरीकडे ही सक्रिय रूग्णसंख्या कमी करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत.
ADVERTISEMENT