चेल्यानेच लोळवलं गुरूला, भगवंत मानच्या यशामुळे सिद्धू म्हणाले ठोको ताली

मुंबई तक

• 06:07 PM • 11 Mar 2022

मुंबई: पंजाबच्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये आम आदमी पार्टीने (AAP) पहिल्याच प्रयत्नामध्ये मारलेल्या मुसंडीची आता सगळीकडे चर्चा होत आहे. सोबतच ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, भगवंत मान हे राजकारणात येण्यापूर्वी स्टँडअप कॉमेडियन होते. पंजाबच्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर असलेले पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (navjot singh siddhu) आणि भगवंत […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: पंजाबच्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये आम आदमी पार्टीने (AAP) पहिल्याच प्रयत्नामध्ये मारलेल्या मुसंडीची आता सगळीकडे चर्चा होत आहे. सोबतच ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, भगवंत मान हे राजकारणात येण्यापूर्वी स्टँडअप कॉमेडियन होते.

हे वाचलं का?

पंजाबच्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर असलेले पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (navjot singh siddhu) आणि भगवंत मान यांच्यातल्या गुरू शिष्याच्या नात्याची कालपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी आणि क्रिकेटर म्हणून रिटायर झाल्यावर सिध्दू यांनी शोबिझमध्ये बरंच नाव कमावलं. क्रिकेट कॉमेंट्री, रियालीटी शोचे जज ते कपिल शर्मा शो मधली त्यांची उपस्थिती हा नेहमीच चर्चेचा विषय असायचा. तो त्यांच्या हटके अंदाजामुळे, शायरीमुळे, ओय गुरू, ठोको थाली या त्यांच्या आगळ्यावेगळ्या डायलॉगजमुळे. पण याच गुरूला त्याच्या चेल्याने राजकारणात मात देण्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे.

2005 साली ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेज’ या शोमध्ये सिध्दू हे त्यावेळी जज होते. आणि त्याकाळात स्टँडअप कॉमेडी करणारे कलाकार भगवंत मान या शो चे एक स्पर्धक होते. भगवंत मानच्या जोक्सवर खळखळून हसणाऱ्या सिध्दूंना त्यांच्याच या चेल्याने पंजाबच्या निवडणुकीत धूळ चारली आहे. त्यामुळे पंजाबच नाही तर देशभरात सिध्दू हे हास्याचा विषय झाले आहेत. राजकारणात सिध्दूंच्या मागाहून प्रवेश करत भगवंत मान यांनी आपल्या गुरुलाच सातवं आस्मान दाखवलं नाही तर गुरूला घरी बसवत मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही मिळवली आहे.

नियतीचा खेळ बघा कसा असतो.. ज्याच्या जोक्सवर सिध्दू हसत होते. त्याच सिध्दूंवर सध्या सोशल मीडियापासून सगळीकडे लोकं हसत आहेत. गुरू-चेल्याच्या या अजब कनेक्शनची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे आणि आता सिध्दूंना स्वत:वरच ठोको थाली म्हणायची वेळ आली आहे.

“सिद्धूंनी तर काम चोख केलं, आता नाना मागे राहून कसं चालेल?”

2017 साली पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. मात्र, गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला केवळ 18 जागाच जिंकता आल्या आहेत. काँग्रेसच्या 59 जागा कमी झाल्या आहेत.

दुसरीकडे काँग्रेसची दिल्लीतील सत्ता हिसकावून घेतल्यानंतर आपने पंजाबमध्येही काँग्रेसला दणका दिला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाने थेट 92 जागा जिंकत घवघवीत यश मिळवलं आहे.

पंजाबमध्ये भाजपची एक जागा कमी झाली आहे. 2017 मध्ये पंजाब विधानसभेत भाजपचे 3 आमदार निवडून गेले होते. यावेळी त्यांना 2 जागाच जिंकता आल्या आहेत. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलालाही फटका बसला आहे. शिरोमणी अकाली दलाला फक्त 4 जागांवर विजय मिळाला असून, 2017 च्या तुलनेत 11 जागा घटल्या आहेत.

    follow whatsapp