एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असताना राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याच्या तयारीत आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रशासन लोकांना गर्दी करु नका असं आवाहन करत असतानाही साताऱ्यात कोरोनाचे सर्व नियम डावलून बगाड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
ADVERTISEMENT
साताऱ्याच्या वाई येथील बावधन भागात बगाड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक उत्सव आणि यात्रांवर बंदी घातलेली असतानाही या गावात बगाड यात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि ज्यात हजारो नागरिक हजर राहिले. ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पहायला मिळाला. यावेळी हजर असलेल्या नागरिकांनी तोंडावर मास्कही घातलेले नव्हते. दरम्यान कोरोनाचे नियम मोडून बगाड यात्रेचं आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासातील राज्यातील आकडा हा हादरवून टाकणारा आहे. कारण राज्यात काल एका दिवसात तब्बल 43,183 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण हा प्रचंड वाढत आहे.
दरम्यान, राज्यात काल 32,641 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 24,33,368 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.2 टक्के एवढे झाले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 249 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.92 टक्के एवढा आहे.
मुंबईत Corona चा कहर दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
ADVERTISEMENT