Nashik: सत्यजित तांबे भाजपत करणार प्रवेश? भाजप नेत्याची घेतली भेट

मुंबई तक

30 Jan 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:04 AM)

bjp offer to satyajeet tambe to join the party : काँग्रेसविरोधात बंडखोरी (Congress Rebel) करून अपक्ष निवडणूक लढवत असलेले सत्यजित तांबे (Satyjeet Tambe) भाजपत (Bjp) प्रवेश करण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपासून सत्यजित तांबे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असताना आता भाजपकडून त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आलीये. विधान परिषद निवडणूक (Mlc […]

Mumbaitak
follow google news

bjp offer to satyajeet tambe to join the party : काँग्रेसविरोधात बंडखोरी (Congress Rebel) करून अपक्ष निवडणूक लढवत असलेले सत्यजित तांबे (Satyjeet Tambe) भाजपत (Bjp) प्रवेश करण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपासून सत्यजित तांबे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असताना आता भाजपकडून त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आलीये. विधान परिषद निवडणूक (Mlc Election 2023) निकालाआधी भाजप नेत्याने केलेल्या विधानामुळे तांबे पिता-पुत्र भाजपत (Sudhir Tambe-Satyajeet Tambe) जाण्याची शक्यता बळावली आहे.

हे वाचलं का?

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. काँग्रेसचा निर्णय धुडकावत सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही. दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी सर्व पक्षीयांनी पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं. त्यामुळे भाजप तांबेंना पाठिंबा देण्याची चर्चा सुरू झाली आणि झालंही तसंच.

सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. तर काँग्रेसनं महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. दुसरीकडे इतर ठिकाणी उमेदवार देणाऱ्या भाजपनं नाशिकमधून उमेदवारच दिला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे आणि भाजपमधील जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली.

MLC Election 2023 : नाशिकमध्ये प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेसाठी आज मतदान

भाजपनं थेटपणे सत्यजित तांबेंना पाठिंबा जाहीर केला नाही, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना निवडून आणायचा निर्णय घेतल्याचं सांगत भाजपची मतं त्यांच्या पेटीत टाकलीये. त्यामुळे भाजप आणि सत्यजित तांबे यांच्यातील जवळीक अखेर समोर आली. त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबेंना थेट ऑफरच दिली.

महत्त्वाचं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधान करण्यापूर्वी रविवारी रात्री (29 जानेवारी) सत्यजित तांबे आणि विखे पाटील यांची भेटही झाली. त्यांच्यात काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही, पण विखे पाटलांनी तांबेंना भाजपत येण्याची ऑफर देऊन टाकली.

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले ते वाचा?

“मला तर शंभर टक्के विजयाची खात्री आहे. सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही”, असं राधाकृष्ण विखे पाटील सुरूवातीला म्हणाले.

त्यानंतर मामा (बाळासाहेब थोरात) वेळेला हजर नसल्यानं, तुम्हाला ऐनवेळी मामाची भूमिका बजवावी लागली का? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले वाचा…

“मामाने काय करावं, हा मामाचा प्रश्न आहे. त्यांनी आता पक्षालाही मामा केलं आहे. त्यांची काय भूमिका असेल, ती त्यांची व्यक्तिगत असेल. परंतु सत्यजितचा विजय हा निश्चित आहे. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला पाहिजे, यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे. बहुतांश ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंसाठीच काम केलं आहे. त्यांना मतदान व्हावं, यासाठी प्रयत्न केले. नैतिकता म्हणून आणि भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आदर, सन्मान सत्यजित तांबे ठेवतील, असं मला वाटतं”, असं म्हणत विखे पाटलांनी सत्यजित तांबेंसाठी भाजपचे दरवाजे खुले असल्याचं स्पष्ट केलं.

निवडणुकीत भाजप सत्यजित तांबेंच्या पाठिंशी

काँग्रेसकडे असलेली नाशिक पदवीधरची जागा स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न भाजपकडून झाल्याचं बघायला मिळालं. भाजपतील निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शुभांगी पाटलांना भाजपने एबी फॉर्मच दिला नाही. दुसरीकडे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठीही प्रयत्न केले गेले. मात्र, शुभांगी पाटलांनी माघार घेतलीच नाही. आता भाजपनं सत्यजित तांबेंना थेट पाठिंबा दिल्याची घोषणा केली नाही, मात्र भाजपची मते मात्र सत्यजित तांबेंच्या मतपेटीत पडली आहेत.

    follow whatsapp