छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? हजारो नेटकरी म्हणतात..

मुंबई तक

03 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:27 AM)

Chhatrapati Sambhaji Maharaj Swaraj Rakshak or Dharmavir Poll: मुंबई: राज्याचे विरोधी पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत (Vidhansabha) केलेल्या एका वक्तव्यामुळे एकच गदारोळ माजला आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर (Dharmavir) कधीच नव्हते. ते स्वराज्यरक्षक (Swaraj Rakshak) होते. असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. ज्यावरुन भाजप […]

Mumbaitak
follow google news

Chhatrapati Sambhaji Maharaj Swaraj Rakshak or Dharmavir Poll: मुंबई: राज्याचे विरोधी पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत (Vidhansabha) केलेल्या एका वक्तव्यामुळे एकच गदारोळ माजला आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर (Dharmavir) कधीच नव्हते. ते स्वराज्यरक्षक (Swaraj Rakshak) होते. असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. ज्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटाने (Shinde Group) आता जोरदार आंदोलनं सुरू केली आहेत. याचबाबत जेव्हा नेटकऱ्यांचं मत काय आहे याविषयी ‘मुंबई Tak’ने एक पोल (Poll) विचारला होता. या पोलमध्ये हजारो जणांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणून घेऊया याचबाबत सविस्तर. (chhatrapati sambhaji maharaj swaraj rakshak or dharmavir what is the exact opinion of netizens)

हे वाचलं का?

सगळ्यात आधी अजित पवारांनी सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांबाबत काय वक्तव्य केलेलं ते जाणून घेऊयात:

‘संभाजीराजे धर्मवीर नव्हते’

‘शिंदे साहेब आता अंधश्रद्धेवर पण बोलत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. श्रद्धा-अंधश्रद्धामध्ये गफलत होत आहे. सिन्नरला जात असताना कुठे गेलात, काय गेलात.. गेलाच नसाल तर आनंदच आहे. कारण आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात अशा अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.’

‘आपण वीर बालदिन जाहीर केलात त्याबद्दल अभिनंदन. जे चांगलं असेल त्याबाबत आम्ही अभिनंदनच करु. परंतु स्वराज्यरक्षक संभाजीराजेंच्या नावाने बालशौर्य पुरस्कार देण्याची आपण अर्थसंकल्पात.. तुम्ही पण त्या अर्थसंकल्पाला मान्यता देत असताना कॅबिनेटला होता. मग त्या कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर मी अर्थसंकल्प तिथे सादर केला.’

‘तो पुरस्कार तुम्ही मग स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तरी तो त्या ठिकाणी पुरस्कार जाहीर करण्याचं आज महाराष्ट्राला सांगून टाका.’

‘मी पुन्हा सांगतो की, आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणतो. काही जणं धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते. कधीच छत्रपती संभाजीराजेंनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे काही जणं जाणीवपूर्वक धर्मवीर.. धर्मवीर’

‘मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळात असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज अशा पद्धतीचा उल्लेख आपण करावा.’ असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आणि राज्यभरात निषेध, आंदोलनं सुरु केली. अशावेळी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या नेटकऱ्यांना आणि तरुणाईला याबाबत नेमकं काय वाटतं याविषयी मुंबई Tak ने एक ट्विटर आणि यूट्यूबवर पोल विचारला. ज्यावर मोठ्या प्रमाणात मतं व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई Tak नेटकऱ्यांना विचारलेला पोल

  • छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्यरक्षक म्हणायचं की धर्मवीर?

यूट्यूबवर विचारण्यात आलेल्या या पोलवर तब्बल 33 हजारांहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे.

‘धर्मवीर’ बोलण्यात वावगं नाही’, पवारांच्या वक्तव्यानं अजितदादा तोंडघशी?

ज्यामध्ये तब्बल 80 टक्के जणांनी छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्यरक्षक म्हटलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. तर 16 टक्के जणांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर होते असं मत व्यक्त केलं आहे. तर 4 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं मत नोंदवलं आहे.

तर दुसरीकडे ट्विटरवर देखील हाच प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर 1200 हून अधिक जणांनी मत व्यक्त केलं आहे.

इथेही यूजर्सने छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षकच होते असं मत दिलं आहे. कारण स्वराज्यरक्षक या पर्यायाला तब्बल 67.2 टक्के जणांनी आपलं मत दिलं आहे. तर 32.8 टक्के लोकांना वाटतं की, संभाजी महाराज हे धर्मवीर होते.

यामुळे नेटकऱ्यांच्या मते संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. मात्र, असं असलं तरीही भाजपने अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी

शरद पवारांनी खोडलं अजित पवारांचं वक्तव्य

एकीकडे अजित पवार हे संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नये या मुद्द्यावर ठाम असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या मुद्द्यावर वेगळं मत व्यक्त केलं आहे.

‘छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा आणि ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा, त्यावरुन वाद नको. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं तरी अयोग्य नाही. धर्मवीर, स्वराज्य रक्षक या दोन्ही उपाधी योग्यच आहेत.’ असं मत शरद पवारांनी व्यक्त करुन एक प्रकारे अजित पवारांनाच अडचणीत आणलं आहे.

यामुळे आता अजित पवार हे या सगळ्या मुद्द्यावर कशाप्रकारे भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp