Mood Of the Nation: लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये CM शिंदे कितव्या नंबरवर?

मुंबई तक

26 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:11 AM)

Mood Of the Nation Survey on Most Popular CM Across India: मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) अगदी अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पद (Chief Minister)मिळालं. भाजपकडे (BJP) 105 आमदारांचं बळ असतानाही अवघ्या 40 आमदारांना घेऊन फुटलेल्या एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री पद देऊ केलं. पण महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या भरभक्कम असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री हे किती लोकप्रिय आहेत याबाबत […]

Mumbaitak
follow google news

Mood Of the Nation Survey on Most Popular CM Across India: मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) अगदी अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पद (Chief Minister)मिळालं. भाजपकडे (BJP) 105 आमदारांचं बळ असतानाही अवघ्या 40 आमदारांना घेऊन फुटलेल्या एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री पद देऊ केलं. पण महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या भरभक्कम असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री हे किती लोकप्रिय आहेत याबाबत India Today-C Voter ने केलेला सर्व्हेत पाहा जनतेने काय कौल दिला आहे. (cm eknath shinde of maharashtra at what number among the popular chief ministers in across india)

हे वाचलं का?

खरं तर भाजपने सहा महिन्यांपूर्वी एक अशी गोष्ट केली की, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. त्यांनी अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं. त्यावरुन अनेक चर्चा झाली की, भाजपला एक असाही मोहरा मिळालाय की, तो मराठाही आहे. पश्चिम महाराष्ट्राशी त्यांचं कनेक्शन आहे. तो मोहरा महाराष्ट्राच्या राजकारणात तर भाजपने दोनदा प्रयत्न करून सुद्धा त्यांना स्वत:च्या बळावर सरकार बनवता आलं नाही. ती अडचण भाजपची दूर होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं रेटिंग काय हे आपण पाहूया.

मूड ऑफ न नेशन सर्व्हेमध्ये विचारलं गेलं की, देशात टॉप 10 मुख्यमंत्री कोण आहेत. तर त्यात पूर्ण देशात योगी आदित्यनाथ हे 39 टक्के पसंतीसह पहिल्या स्थानी आहेत. तर 2.2 टक्क्यांसह एकनाथ शिंदे हे 8 व्या स्थानी आहे.

महाराष्ट्राने CM म्हणून शिंदेंना स्वीकारलं?, काय आहे Mood Of the Nation

भारतात आज घडीला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचं नाव समोर आलं आहे. त्यांना तब्बल 39 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली असून लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.

ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर (7 टक्के पसंती), M. K. स्टॅलिन चौथ्या क्रमांकावर (5 टक्के पसंती), नवीन पटनायक पाचव्या क्रमांकावर (3 टक्के पसंती), हेमंत बिसवा सरमा सहाव्या क्रमांकावर (3 टक्के पसंती), शिवराज सिंह चौहान सातव्या क्रमाकांवर (2.4 टक्के पसंती) आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना फक्त 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

Mood of the Nation : महाराष्ट्र BJPची झोप उडवणारा कौल, MVA मारणार मुसंडी!

देशात आज घडीला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? Most Popular CM (Across India) पाहा संपूर्ण यादी:

  1. योगी आदित्यनाथ (उत्तरप्रदेश) – देशभरातील 39.1 टक्के लोकांची पसंती

  2. अरविंद केजरीवाल (दिल्ली)- देशभरातील 16 टक्के लोकांची पसंती

  3. ममता बॅनर्जी (प. बंगाल) – देशभरातील 7.3 टक्के लोकांची पसंती

  4. M.K. स्टॅलिन (तामिळनाडू) – देशभरातील 4.6 टक्के लोकांची पसंती

  5. नवीन पटनायक (ओडिशा) – देशभरातील 3.4 टक्के लोकांची पसंती

  6. हेमंत बिस्वा सरमा (आसाम) – देशभरातील 2.5 टक्के लोकांची पसंती

  7. शिवराज सिंह चौहान (मध्यप्रदेश) – देशभरातील 2.4 टक्के लोकांची पसंती

  8. एकनाथ शिंदे (महाराष्ट्र) – देशभरातील 2.2 टक्के लोकांची पसंती

  9. YS जगन मोहन रेड्डी (आंध्रप्रदेश) – देशभरातील 1.6 टक्के लोकांची पसंती

  10. भूपेश बघेल (छत्तीसगड) – देशभरातील 1.4 टक्के लोकांची पसंती

देशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सगळ्या वरचा क्रमांक आहे. तर दुसरा क्रमांक हा अरविंद केजरीवाल यांचा आहे. पण देशभरात झालेल्या राज्यात एकनाथ शिंदे यांचा मात्र 8वा क्रमांक लागतो.

    follow whatsapp