Satara : छत्रपती उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये राजकीय धुळवड : चित्रावरुन पेटला वाद

मुंबई तक

07 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:54 PM)

Chhatrapati Udyanraje Bhosale Painting Controversy : सातारा : होळी आणि धुलवडीमध्ये साताऱ्यात राजकीय धुळवड रंगली आहे. भाजप (BJP) खासदार उदयनराजे (Chhatrapati Udyanraje Bhosale) यांच्या भिंतीचित्रावरुन हा वाद रंगला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांना त्यांचं चित्र काढायचं आहे. यालाच शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) […]

Mumbaitak
follow google news

Chhatrapati Udyanraje Bhosale Painting Controversy :

हे वाचलं का?

सातारा : होळी आणि धुलवडीमध्ये साताऱ्यात राजकीय धुळवड रंगली आहे. भाजप (BJP) खासदार उदयनराजे (Chhatrapati Udyanraje Bhosale) यांच्या भिंतीचित्रावरुन हा वाद रंगला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांना त्यांचं चित्र काढायचं आहे. यालाच शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांचा विरोध आहे.

पालकमंत्री देसाई आणि उदयनराजे समर्थक यांनी सामोपचाराने हा विषय मिटवला असल्याचं सांगितलं जात आहे. तर याबाबत बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, खासदारांच्या पेंटिंगचा वाद महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि काश्मिरच्या वादापेक्षाही गहण आहे. मुळात खासदारांचे पेंटिंग कुठे काढायचे याबाबत राज्यसभा निर्णय देईल, हा सर्व बालिशपणाचा कळस आहे. यातून काय साध्य होणार आहे, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी उदयनराजे यांच्या पेंटिंगच्या विषयाची खिल्ली उडवली.

ना कोहली ना सूर्यकुमार… एबी डिव्हिलियर्स म्हणतो, ‘हा’आहे T20तला सर्वात बेस्ट खेळाडू

आपल्या समर्थकांना आवर घालण्याचं काम नेत्यानेच करायचं असतं. पण, नेताच रात्री अपरात्री चित्र कुठे काढायची हे बघत फिरत असेल आणि पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर अवघड गोष्ट आहे. हे चित्र काढणारे समर्थक कोण आहेत, त्यांची बुध्दी काय हे सगळ्यांना माहिती आहे. आता भिंतीवर चित्र काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढा म्हणजे हायवेवरुन दिसेल, असा टोलाही शिवेंद्रराजे यांनी लगावला.

Lalu Prasad Yadav यांच्या अडचणी वाढवणार ‘लॅण्ड फॉर जॉब’ घोटाळा काय?

आमदार शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, हा काय सातारच्या विकासाचा विषय नाही. ‘साठी बुद्धी नाठी..’ या म्हणी प्रमाणे साठीच्या दिशेने सध्या महाराजांची वाटचाल सुरु आहे. ती म्हण लागू होऊ नये, यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवर घालावा. विकास कामांसाठी रस्त्यावर उतरावं. पेटिंगसाठी आठवडाभर रात्री-अपरात्री हा प्रकार सुरु आहे. निव्वळ बालिशपणा आणि ‘इगो’ तूनच हा विषय झाला आहे. कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम नेत्याने करावे. त्यासाठी त्यांना परमेश्वराने बुद्धी द्यावी हीच माझी अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमुद केले.

    follow whatsapp