कोल्हापूर : अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, मालोजीराजेंचीही उपस्थिती

मुंबई तक

• 05:01 AM • 14 Jun 2021

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेल्या उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेस येथे ही भेट झाली असून या भेटीदरम्यान खासदार संभाजीराजे यांचे बंधू मालोजीराजेही उपस्थित होते. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकीदरम्यान वसंतराव मुळीक, इंद्रजित […]

Mumbaitak
follow google news

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेल्या उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेस येथे ही भेट झाली असून या भेटीदरम्यान खासदार संभाजीराजे यांचे बंधू मालोजीराजेही उपस्थित होते. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

हे वाचलं का?

या बैठकीदरम्यान वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत हे देखील उपस्थित होते. अजित पवारांची ही भेट नियोजित नव्हती. परंतू आज सकाळी अचानक अजित पवार अचानक भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. या बैठकीला मराठा समाजाचे काही नेतेही हजर असल्याचं कळतंय. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर १६ जून ला कोल्हापुरात मोर्चा काढण्याची तयारी संभाजीराजेंनी केली आहे.

मराठा आरक्षणाबद्दल संभाजीराजे यांनी राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात मराठा समाज मुंबईकडे कूच करेल असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. आम्हाला राजकारणात रस नाही पण समाजाला आरक्षण कधी मिळेल एवढंच सांगा असं म्हणत संभाजीराजेंनी राज्य सरकारला तातडीने पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं.

दरम्यान, कोल्हापुरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

    follow whatsapp