Lightning strikes: निसर्ग कोपला, वीज कोसळून Rajasthan मध्ये 23 तर UP मध्ये 18 जणांचा मृत्यू

मुंबई तक

• 07:42 PM • 11 Jul 2021

सध्या निसर्ग हा चांगलाच कोपला आहे. त्यामुळेच आता आस्मानी संकटला देखील भारताला तोंड द्यावं लागत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्यस्थानमध्ये वीज कोसळून तब्बल 23 जणांचा तर उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे दोन्ही राज्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रयागराज, फिरोजाबाद यासारख्या अनेक ठिकाणी वीज कोसळून अनेकांचा हकनाक बळी गेल्याचं […]

Mumbaitak
follow google news

सध्या निसर्ग हा चांगलाच कोपला आहे. त्यामुळेच आता आस्मानी संकटला देखील भारताला तोंड द्यावं लागत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्यस्थानमध्ये वीज कोसळून तब्बल 23 जणांचा तर उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे दोन्ही राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

प्रयागराज, फिरोजाबाद यासारख्या अनेक ठिकाणी वीज कोसळून अनेकांचा हकनाक बळी गेल्याचं आता समोर येत आहे.

राजस्थानमध्येही वीजेचा कहर, 23 जणांचा घेतला बळी

जयपूरमध्ये एकीकडे मुसळधार पाऊस आणि प्रचंड वीजांच्या कडकडाटाने मोठी दुर्घटना घडली आहे. आमेर येथे वीज कोसळल्याने तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन व एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून सर्च मोहीम सुरू आहे.

याशिवाय राजस्थानमधील तब्बल 7 मुलांचाही वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील कानवास गावात रविवारी धौलपूर येथे चार मुलांचा मृत्यू झाला. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राजस्थानमध्ये वीज कोसळून तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते आहे.

यूपीमध्ये 18 जणांचा वीज कोसळून मृत्यू

राजस्थानप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये देखील वीज कोसळून तब्बल 18 जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती मिळते आहे. याशिवाय एका शेतातील 42 बकऱ्या आणि एका गायीचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याचं आता समोर आलं आहे.

दरम्यान, आता येथील स्थानिक प्रशासनाने ज्या-ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या आहे तेथील सर्व मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्घटनेत जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांना तात्काळ आर्थिक मदत घोषित केली जावी अशी मागणी केली जात आहे.

Jalgaon: एकाच गावातील दोघांचा वीज कोसळून मृत्यू

उत्तरप्रदेशमधील एकट्या प्रयागराजमध्ये वीज कोसळून 14 जण ठार झाले आहेत. यामध्ये सोराण भागातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जणांचा करछना भागात, तर इतर ठिकाणी तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.

    follow whatsapp