पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सकाळी सात वाजेपासून ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी आहेत. तिथे संजय राऊत यांचे वकिलही दाखल झालेले आहेत. सध्या संजय राऊत हे सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला.
ADVERTISEMENT
पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. संजय राऊत यांची सकाळपासून संजय राऊत यांची चौकशी ईडी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घरी सुरू आहे. ईडीचे अधिकारी दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांचे वकील तिथे दाखल झाले आहेत.
दरम्यान, सकाळपासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरात असून, आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत हे ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करत नाहीये. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांनी सोबत ईडी कार्यालयात चालण्याची सांगितलं. त्याला राऊतांकडून विरोध होतोय.
‘संजय राऊत हे शरद पवारांचेच, ते शिवसैनिक नाहीत’; रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवरही टीकेचे बाण
सुत्रांच्या माहितीप्रमाणे संजय राऊत यांनी ईडी कार्यालयात जाण्यास विरोध केला आहे. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून, त्यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंतची वेळ मागितली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू असताना ईडी कार्यालयात चौकशीला येऊ शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं.
संजय राऊत यांच्या वकिलानीही याच मुद्द्यावरून ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला आहे. संजय राऊत यांनी ईडीकडून २० जुलै आणि २७ जुलै रोजी समन्स बजावण्यात आलं होतं. त्याचवेळी संजय राऊत यांच्या वकिलांनी संसदेच्या अधिवेशनामुळे चौकशीला उपस्थित राहू शकत नाही, असं ईडी कार्यालयाला कळवलं होतं. ७ ऑगस्टला बोलवलं गेलं, तर हजर राहू असं संजय राऊतांकडून ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं जात आहे.
संजय राऊत यांच्यामागे ज्यामुळे ईडीचा फेरा लागला, ते पत्रा चाळ प्रकरण काय?
संजय राऊतांची ईडीकडून १० तास चौकशी
संजय राऊत यांना यापूर्वी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर १ जुलै २०२२ रोजी संजय राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १० तास चौकशी केली होती. त्यानंतर २० जुलैला संजय राऊत समन्स बजावलं गेलं होतं. तसेच २७ जुलै रोजी ईडीकडून दुसरं समन्स बजावलं गेलं.
२७ जुलै रोजी संजय राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी राहिले नाही. त्यांनी वकिलामार्फत ईडीला कळवलं होतं. त्यानंतर रविवारी (३१ जुलै) ईडीचे एक पथक सकाळीच संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं होतं.
ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या घराबाहेर गर्दी केली. संजय राऊतांच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांकडून आता भाजप आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहेत. आता ईडी संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेणार की रिकाम्या हाताने परत जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
ADVERTISEMENT