भाजपसोबत युती करणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पाताळात गेली पातळी..’

मुंबई तक

• 04:58 PM • 25 Feb 2022

मुंबई: राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे वाद होत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरीही राजकारणात कधीही काहीही शक्य आहे. अशावेळी शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करणार का? हा सवाल अनेक जण वारंवार विचारतात. मात्र, आता याच प्रश्नाबाबत स्वत: उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. ‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत संपादक गिरीश कुबेर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे वाद होत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरीही राजकारणात कधीही काहीही शक्य आहे. अशावेळी शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करणार का? हा सवाल अनेक जण वारंवार विचारतात. मात्र, आता याच प्रश्नाबाबत स्वत: उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत संपादक गिरीश कुबेर यांनी याचबाबतचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी याबाबत सविस्तरपणे उत्तर दिलं. तसंच भाजपला टोमणेही लगावले.

युतीबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘सर्वात आधी ते ज्या पद्धतीने चालले आहेत ते सुधारणार आहेत का?’ असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट निशाणा साधला.

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:

‘स्वबळावर सत्ता आणणं हे प्रत्येक पक्षाचं आणि प्रत्येक पक्षप्रमुखाचं स्वप्न असतं. किंबहुना असं स्वप्न असलंच पाहिजे. नसेल तर तुम्ही नालायक ठराल त्या जागेवर बसायला. पण आत्ताच्या परिस्थितीत जी महाराष्ट्राची स्थिती आहे कोणालाही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळणार नाही. मग निदान.. ज्याला आपण मुलामा दिलेला शब्द आहे की, मिनिमम कॉमन प्रोगाम.. मग तो घेऊन चला पुढे.’

‘शिवसेनेशिवाय राजकारण पुढे सरकता कामा नये एवढी ताकद आपली असली पाहिजे. आघाडीच्या काळात हेही खरं आहे की, विकास चांगला होतो. मध्यला काळात बॅलन्सचा जो प्रॉब्लेम झाला होता तो माझ्यापुरता झाला होता. पण सरकार चालवताना जो बॅलन्स करावा लागतो तो पण मी करतोय.’

‘कोणाचा द्वेष असा नाही. मी मोकळेपणाने सांगतो. भाजप नको असं नाही.. माझा देश हा महत्त्वाचा आहे. देश कसा चालला पाहिजे, राजकारण कसं झालं पाहिजे त्यासाठी सर्व एकत्र आले पाहिजे.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘…यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती’; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

प्रश्न: या विधानाचा असाही अर्थ लावायचा का की, भाजपशी पुन्हा युती होऊ शकते का?

उद्धव ठाकरे: असा अर्थ लावायचा असेल तर.. सर्वात आधी ते ज्या पद्धतीने चालले आहेत ते.. ते सुधारणार आहेत का? ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळात जी आमची युती झाली होती एक वैचारिक पातळीवर युती झाली होती. आता वैचारिक पातळी सोडा कुठे पाताळात गेली पातळी तेच माहित नाही. विचार वैगरे काहीच राहिले नाहीत. तुम्ही कोणाबरोबरही युती केलीत.. त्यांच्याच कित्ता आम्ही गिरवला. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती सध्या तरी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp