Satish Kaushik: मुंबई: अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) हे 8 मार्च रोजी सकाळी दिल्लीला (Delhi) पोहोचले. यानंतर त्यांनी विमानतळावरून थेट बिजवासन येथील फार्म हाऊस गाठले. हे फार्म हाऊस त्यांचा जुना मित्र आणि कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू (Vikas Malu) यांचे आहे. या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोन दिवसांनी विजय मालूच्या पत्नीने एक खळबळजनक दावा केला आहे. चला तर मग जाणून घेऊया सतीश कौशिकसोबत शेवटच्या 12 तासात काय घडलं? (farm house heart attack or murder conspiracy know the story of last 12 hours of satish kaushik)
ADVERTISEMENT
7 मार्च 2023, जुहू – मुंबई
होळीच्या एक दिवस आधी जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या घरी होळी पार्टी केली. सर्व पाहुण्यांसोबत सतीश कौशिक यांनीही होळी पार्टीला हजेरी लावली. जावेद अख्तर आणि सतीश कौशिक हे खूप जुने मित्र आहेत. सतीश कौशिक संपूर्ण पार्टी दरम्यान पूर्णपणे ठीक होते. या पार्टीचे अनेक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पार्टी आटोपल्यानंतर सतीश कौशिक संध्याकाळी वर्सोवा येथील त्यांच्या घरी पोहोचले. या घरात सतीश कौशिक पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिकासह राहत होते. रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र होते. तेव्हाही सतीश कौशिक पूर्णपणे बरे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची दिल्लीला जाण्यासाठी फ्लाइट होती.
8 मार्च 2023, मालू फार्म हाऊस, बिजवासन, दिल्ली
सतीश कौशिक यांचे सुमारे 30 वर्ष जुने मित्र आणि व्यापारी विकास मालू यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर होळी पार्टीचे आयोजन केले होते. या होळीच्या पार्टीत सतीश कौशिक यांच्या येण्याचा बेत अनेक दिवसांपूर्वीच झाला होता. विकास मालू हे कुबेर ग्रुपचे मालक आहेत. हाच कुबेर ग्रुप जो सर्व प्रकारचे पान मसाले बनवतो आणि ज्याचा व्यवसाय सुमारे 50 देशांमध्ये पसरलेला आहे. सतीश कौशिक सकाळी 11.30 च्या सुमारास मालू फार्म हाऊसवर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे व्यवस्थापक संतोष रायही होते. होळी पार्टीत एकूण 40 ते 45 पाहुणे होते. दिवसा होळी पार्टी होती. सतीश कौशिक या पार्टीत खूप आनंदी तर दिसत होते. दिल्लीत झालेल्या या होळी पार्टीचा व्हिडीओही समोर आला आहे. कदाचित तो सतीश कौशिक यांच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडिओ असावा. ज्यामध्ये ते पांढरा कुर्ता पायजमा घालून त्यांचा मित्र विकास मालूसोबत डान्स करताना दिसत आहेत.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं आणि या गुटखा किंगचं काय आहे कनेक्शन?
रात्री 10.30 वाजता कौशिक गेले झोपण्यासाठी
रात्री उशिरापर्यंत होळीची पार्टी सुरू होती. मात्र, सतीश कौशिक यांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जेवण केले आणि त्यानंतर फार्म हाऊसमधीलच त्यांच्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. संध्याकाळी उशिरा ते पुन्हा सर्व पाहुण्यांना भेटले. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास त्यांनी जेवण केले. तेव्हाही सतीश कौशिक एकदम बरे होते. रात्रीचे जेवण करून ते आपल्या खोलीत झोपायला गेले तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते.
मध्यरात्री मॅनेजरला केला फोन
सतीश कौशिक त्यांच्या आगामी ‘कागज-2’ चित्रपटावर काम करत होते. त्याच चित्रपटाच्या एडिटशी संबंधित काही महत्त्वाचे काम उरकून रूमवर गेल्यावर ते झोपी गेले. पण त्यानंतर रात्री 12.10 वाजताच त्यांनी व्यवस्थापक संतोष राय याला फोन करायला सुरुवात केली. आवाज ऐकून संतोष राय त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा सतीश कौशिक बेडवर असल्याचे संतोषच्या लक्षात आले. त्यांनी संतोषला सांगितलं की, ‘मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. मला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा.’ संतोषने त्यांना लगेच गाडीतून फार्म हाऊसपासून जवळच्या फोर्टिस रुग्णालयात नेलं.
“रशियन गर्लला बोलवून सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊ” : महिलेच्या तक्रारीने खळबळ
रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले
संतोष राय यांच्या म्हणण्यानुसार, सतीश कौशिक कारमध्ये असतानाही शुद्धीवर होते. ते सारखं म्हणत होते की, ‘मला मरायचे नाही… मला वाचवा, मला वंशिकासाठी जगायचे आहे. शशी आणि वंशिकाची काळजी घ्या.’ संतोषच्या म्हणण्यानुसार, होळीची रात्र असल्याने रस्त्यावर वाहतूक नव्हती. त्यामुळेच ते अगदी आठ मिनिटांत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र त्यांची गाडी फोर्टिसच्या गेटजवळ येताच सतीश कौशिक बेशुद्ध पडले होते. त्यांना इमर्जन्सीमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सतीश कौशिक यांना दिल्लीहून गुरुग्रामला आणण्यात आल्याने फोर्टिस हॉस्पिटलने तत्काळ दिल्ली पोलिसांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर सकाळपर्यंत सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी त्यांच्या सर्व प्रियजनांना मिळाली होती.
मुंबईत करण्यात आले अंत्यसंस्कार
हे प्रकरण एका सुप्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूशी संबंधित असल्याने दिल्ली पोलिसांनीही कोणताही हलगर्जीपणा केला नाही. फोर्टिस रुग्णालयातून मृतदेह दिल्लीतील सरकारी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आला. तेथे त्यांचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर एअर अॅम्ब्युलन्सने मृतदेह मुंबईला नेण्यात आला. जिथे 9 मार्चलाच सतीश कौशिक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Satish Kaushik Death: 15 कोटी रुपयांसाठी झाली सतीश कौशिकची हत्या?
10 मार्च 2023 – दिल्ली पोलिसांनी जारी केले एक निवेदन
10 मार्च रोजी दिल्ली पोलिसांनी एक निवेदन जारी केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांच्या मृत्यूमागे कोणताही कट असल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सतीश कौशिक यांच्या हृदयात 98 टक्के ब्लॉकेज होते. तरी संशयाला जागा राहू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी रक्ताचे नमुने आणि व्हिसेरा तपासणीसाठी पाठवले आहेत. जेणेकरुन सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण अन्नात अमली पदार्थ, अंमली पदार्थांचे ओव्हरडोज, विष किंवा कोणतीही विषारी गोष्ट मिसळून दिली असेल, तर त्याचाही खुलासा होईल. व्हिसेरा रिपोर्ट यायला 10-15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. पण शवविच्छेदन अहवाल आणि हृदयात ब्लॉकेजची बातमी आल्यानंतर मृत्यूमागे कोणताही कट नव्हता हे जवळपास स्पष्ट झाले.
दोन दिवसांनंतर महिलेने पोलिसांना ईमेलद्वारे तक्रार पाठवली.
पण सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी एका महिलेने ई-मेलच्या स्वरूपात दिल्ली पोलिसांना तक्रार पाठवली. ही स्त्री दुसरी-तिसरी कोणी नसून ती विकास मालूची दुसरी पत्नी सान्वी आहे. सध्या मालू पती-पत्नीचा घटस्फोट झालेला नसला तरी ऑक्टोबर 2022 पासून दोघेही वेगळे राहत आहेत. तर सर्वप्रथम सान्वीच्या तक्रारीबद्दल बोलूया, जी तिने दिल्ली पोलिसांना ई-मेलद्वारे पाठवली आहे.
अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू कशामुळे झाला?
सान्वीचा आरोप – सतीशचा मृत्यू नैसर्गिक नाही
त्यामुळे सान्वीच्या त्या तक्रारीनुसार सतीश कौशिकचा मृत्यू नैसर्गिक नसून खून असू शकतो. मालूने सतीश कौशिककडून घेतलेले 15 कोटी हे हत्येचे कारण आहे. विजय मालू यांना हे पैसे परत करायचे नव्हते. त्यामुळेच त्याने त्यांना अमली पदार्थ देऊन त्यांची हत्या केली. मालू ड्रग्जचा व्यवसाय करतो आणि त्याचे अंडरवर्ल्डशीही संबंध आहेत.
सान्वीचा तपास अधिकाऱ्यावर विश्वास नाही
साहजिकच तक्रार गंभीर होती. त्यामुळे या तक्रारीनंतर लगेचच दिल्ली पोलिसांनीही तपास सुरू केला. फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांची यादी शोधली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले. विकास मालू यांचीही चौकशी केली. सान्वीच्या आरोपांवर आज तकने विकास मालूशीही चर्चा केली. पण दरम्यान, सान्वीने स्वत: पोलीस तपासात सहकार्य करण्यास किंवा आपला जबाब नोंदवण्यास नकार दिला असून, ज्या इन्स्पेक्टरला तपास अधिकारी बनवण्यात आले आहे, त्यांच्यावर आपला विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.
“माझ्या पतीनेच अभिनेते सतीश कौशिक यांची हत्या केली”, महिलेनं सांगितलं कारण
शशी कौशिक यांनी सान्वीचे आरोप फेटाळून लावले
मात्र, दुसरीकडे खुद्द सतीश कौशिक यांची पत्नी शशी कौशिक यांनी सान्वीचे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सतीश आणि मालू हे खूप जुने मित्र होते आणि त्यांच्यामध्ये कधीही व्यावसायिक संबंध नव्हते. तसेच सतीश कौशिक यांनी कधीही मालूला 15 कोटी रुपये दिले नाहीत. पतीच्या मृत्यूमागे कोणतेही षडयंत्र नसल्याचे शशी कौशिक यांचे म्हणणे आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
कोण आहे सान्वी?
आता प्रश्न असा आहे की, डॉक्टर, पोलीस आणि स्वत: सतीश कौशिक यांच्या पत्नीचा सतीश कौशिक यांचा सामान्य मृत्यू असल्याचं म्हणत असताना दुसरीकडे सानवी नावाची ही महिला त्यांच्या मृत्यूला हत्येशी किंवा हत्येचा कट असल्याचं का म्हणत?
दिल्लीची रहिवासी असलेली सान्वी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 2019 मध्ये सान्वीने कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांच्याशी लग्न केले होते. जो आधीच विवाहित होता. विकास मालू हा मुख्यतः दुबईत राहतो. त्याला पहिल्या पत्नीपासून मुलेही आहेत. मुलगा मोठा आहे. विकास मालूच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या दोन वर्षानंतरच त्यांच्या पत्नीसोबत मतभेद सुरू झाले. सानवी भारतात व्यवसाय करण्यासाठी 9 लाख डॉलर्स मागत होती. पैसे न दिल्याने भांडण सुरू झाले होते. ऑक्टोबर 2022 मध्ये पती-पत्नीमध्ये विभक्त झाले होते. सान्वी दुबईहून दिल्लीत आली. यानंतर सान्वीने मालू आणि त्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला होता.
Satish Kaushik Death: सतीश कौशिकांसोबत शेवटच्या क्षणी काय-काय झालं?
सान्वीने तक्रारीसोबत पाठवला एक फोटो
सान्वीने दिल्ली पोलिसांना पाठवलेल्या तक्रारीत एक फोटोही शेअर केला आहे. मालूचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशीही संबंध असल्याचा आरोप सान्वीने केला आहे. चित्रातील एका व्यक्तीला घेरून, सान्वीने दावा केला आहे की, हे ऑगस्ट 2022 मधील त्यांच्या पार्टीचे फोटो आहेत आणि या चित्रातील वर्तुळात उपस्थित असलेली ही व्यक्ती दुसरी कोणी नसून दाऊद इब्राहिमचा मुलगा आहे. मात्र, खुद्द मालूच्या म्हणण्यानुसार ही व्यक्ती गुजरातमधील व्यापारी आहे.
व्हिसेरा रिपोर्टमुळे उलगडणार मृत्यूचे रहस्य!
सान्वीने दिल्ली पोलिसांकडे तक्रार पाठवून खळबळ उडवून दिली. मात्र आपले म्हणणे नोंदवण्यापूर्वी तिने दिल्ली पोलिसांसमोर एक अटही ठेवली आहे. आता पाहावे लागेल की, तक्रारीनुसार सान्वी पोलिसांना काही ठोस पुरावे देऊ शकते की नाही? या तक्रारीमुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत जे प्रश्न निर्माण झाले असले तरी लागलीच त्याची उत्तरे मिळण्याची आशा कमी आहे. कारण त्यापूर्वी व्हिसेरा रिपोर्ट येणार नाही आणि जोपर्यंत व्हिसेरा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सतीश कौशिक यांचा मृत्यू ड्रग्समुळे झाला की विषामुळे हे सिद्ध होणार नाही.
प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा
ADVERTISEMENT