मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. पॉर्न केसमध्ये अडकल्यानंतर आता राज कुंद्रा पुन्हा एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकताना दिसत आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टीही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
शिल्पा-राज कुंद्रा विरुद्ध कोणी दाखल केला FIR?
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा तक्रार नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने केली आहे. नितीन बाराई यांनी तक्रार दाखल करून शिल्पा आणि राज यांच्यावर 1.51 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2014-2015 मध्ये फिटनेस कंपनीच्या माध्यमातून 1.51 कोटींची फसवणूक केल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे.
शिल्पा-राज कुंद्रा यांच्याविरोधात ‘हे’ गुन्हे दाखल
तक्रारदार नितीन बाराई यांच्या तक्रारीनंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (B)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू करणार आहेत. त्यामुळे पैशांच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची चौकशी होऊ शकते.
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रानं शर्लिन चोप्राविरुद्ध दाखल केला 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा!
पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला खावी लागली होती तुरुंगाची हवा
दरम्याना, काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा तुरुंगातून सुटून बाहेर आला आहे. पॉर्न व्हिडिओ बनवणं आणि त्याच्याशी संबंधित इतर आरोपाप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती आणि अनेक दिवस त्याला तुरुंगात काढावे लागले होते. राज कुंद्रा हा सध्या जामिनावर बाहेर आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज याने मीडियापासून अंतर राखले. त्याने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तसेच त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट करण्यात आले आहे.
राज कुंद्रा आणि शिल्पाचे आयुष्य हळूहळू रुळावर येऊ लागले. दोघेही नुकतेच एकत्र मंदिरात जाताना दिसले होते. मात्र आता पुन्हा एकदा शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT