ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, अभिषेक घोसाळकर नेमके कोण?

मुंबई तक

• 10:00 PM • 08 Feb 2024

कल्याणमधील गायकवाड गोळीबार प्रकरण ताजे असतानाच ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर फेसबूक लाईव्ह चालू असतानाच गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

crime news

Abhishek Ghosalkar Mauris Bhai

follow google news

बातम्या हायलाइट

point

अभिषेक घोसाळकर नेमके कोण?

point

तडफदार नेतृत्व अभिषेक घोसाळकर

point

घोसाळकरवर का झाला गोळीबार?

Abhishek Ghosalkar : कल्याणमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड (MLA Ganapat Gaikwad) यांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एका माजी नगरसेवकावर (Ex-Corporator) गोळीबार (Firing) केल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेत ज्याच्यावर गोळीबार झाला आहे  व ज्याने केला होता त्यानेही स्वतःवर गोळी झाडली आहे. 

हे वाचलं का?

घोसाळकरांची परिस्थिती गंभीर

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबार झाल्यानंतर त्यांना अभिषेक घोसाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर  ज्या मॉरिस भाईने स्वतःवरही गोळी झाडून घेतली आहे. त्यामध्ये दोघंही गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

हे ही वाचा >> Abhishek Ghosalkar: ठाकरेंच्या नेत्यावर बेछूट गोळीबार

मॉरिसने झाडल्या गोळ्या

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात गायकवाड गोळीबार प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस भाईने गोळीबार केला आहे. त्यानंतर मॉरिसने स्वतःवरही तीन ते चार गोळ्या झाडून घेतल्या. ही घटना घडल्यानंतर रुग्णलयाबाहेर आणि घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे आता अभिषेक घोसाळकर नेमके कोण होते असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

अभिषेक घोसाळकर नेमके कोण?

गोळाबारात मृत्यूमुखी पडलेले अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव होते. अभिषेक घोसाळकर यांनी मुंबई महानगरपालिकेत दोन वेळ नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अभिषेक घोसाळकर दहिसरमधील उभारतं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.  

तडफदार नेतृत्व

अभिषेक घोसाळकर यांच्याकडे तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जात होते. लोकांची कामं करत असताना त्यांच्याकडून अगदी कोणतंही काम तळमळीनं केलं जात होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे आता त्यांची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अभिषेक घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर सातचे नगरसेवक होते. तर त्यांची पत्नीही आता वॉर्ड नंबर एकची नगरसेविका आहे.

 

    follow whatsapp