Girish Bapat Passed Away : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाल्याची घटना घडलीय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भाजपचे पुण्याचे शहर अध्यक्ष जगदीश मुलीक यांनी गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती दिली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजकारणातील अनेक दिग्गज नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांना श्रद्धांजली देत आहे. बापट यांच्या निधनाने पु्ण्याच्या राजकारणातला चाणक्य हरपल्याच्या भावना व्यक्त होतायत. दरम्यान यानिमित्त गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात. (girish bapat passed away, corporator to pune bjp face Read his full political journey)
ADVERTISEMENT
राजकीय प्रवास
राजकारणात प्रवेश करण्यापुर्वी गिरीष बापट टेल्को कंपनीत काम करायचे. खासदार गिरीश बापट (Girish Bapat) मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहीले आहेत. मात्र नंतर जनसंघाची स्थापना झाली आणि ते राजकारणाकडे वळले होते. त्यानंतर त्यांनी नगरसेवक पदापासून सुरुवात करत आमदार की आणि खासदार की लढवत ते राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले होते. 1980 साली त्यांनी पु्णे शहर भाजपच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर 1983 मध्ये गिरीश बापट (Girish Bapat) पहिल्याच प्रयत्नात पुणे महानगरपालिकेत (Pune mahanagarpalika) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग तीन टर्म नगरसेवकपदी ते निवडून आले होते. तसेच महापालिकेत सत्ता नसतानाही गिरीश बापट स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
हे ही वाचा : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन
गिरीश बापट (Girish Bapat) 1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवून विधानसभेत दाखल झाले होते. 2014 पर्यंत पाच वेळा विधानसभेवर निवडून आले होते. 1996 साली त्यांनी भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण कॉंग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी बापट यांचा पराभव केला होता. तसेच 2019 मध्ये त्यांना पुन्हा खासदारकीचे तिकीट मिळाले होते. या निवडणुकीत बापट यांनी कॉंग्रेसच्या महेश जोशी यांचा 96 हजार मतांनी पराभव केला होता.
हे ही वाचा : कर्नाटकात बिगुल वाजला! 13 मे रोजी ‘निकाल’
नुकत्याच पार पडलेल्या कसबा पोट निवडणूकीत (Kasba Bypoll) भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या विजयासाठी गिरीश बापट यांनी प्रचार केला होता. प्रकृती ठीक नसतानाही गिरीश बापट यांना भाजपने प्रचारात उतरवल्याचं पाहायला मिळालं होतं. नाकात ऑक्सिजन नळी लावून गिरीश बापट यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आणण्यात आलं होतं. जिथे त्यांना शब्द उच्चारणंही कठीण जात होतं. ज्यावरून भाजप नेत्यांवर बरीच टीका देखील झाली होती. मात्र या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला होता. पुण्यातील भाजपचे जुने जाणते नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत त्यांचा दबदबा होता. मात्र गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपचा पुण्यातला चाणक्य हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT