२-३ आठवडे विश्रांतीवर गेलेल्या मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोर धरायला सुरुवात केली आहे. १५ जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. याचसोबत मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
रविवारी मुंबईसह लगतच्या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. परंतू सकाळी कोसळलेल्या सरींनंतर दिवसभर पावसाने पुन्हा विश्रांतीच घेतली. काहीकाळासाठी मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली. IMD ने आजच्या दिवशी कोकण आणि गोव्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या ठिकाणी तुरळक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
याचसोबत महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. याचसोबत घाटमाथा परिसरातील तुरळक भागांत अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा-विदर्भामध्येही बहुतांश ठिकाणी आज पावसाचं आगमन होऊ शकतं.
ADVERTISEMENT