स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन, १०६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई तक

• 03:40 AM • 05 Nov 2022

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन झालं आहे. देशातले पहिले मतदार श्याम सरण नेगी यांनी वयाच्या १०६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरूवात धझाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मतदानाचं शेवटचं कर्तव्यही बजावलं होतं. हिमाचल प्रदेशातल्या कल्पा या गावातले ते रहिवासी होते. २ नोव्हेंबरला म्हणजे अगदी तीन […]

Mumbaitak
follow google news

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन झालं आहे. देशातले पहिले मतदार श्याम सरण नेगी यांनी वयाच्या १०६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरूवात धझाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मतदानाचं शेवटचं कर्तव्यही बजावलं होतं. हिमाचल प्रदेशातल्या कल्पा या गावातले ते रहिवासी होते. २ नोव्हेंबरला म्हणजे अगदी तीन दिवसांपूर्वीच त्यांनी पोस्टल मतदान केलं होतं. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे त्यासाठी त्यांनी मतदान केलं.

हे वाचलं का?

श्याम सरण नेगी यांनी ३३ वेळा केलं मतदान

स्वतंत्र भारतातले पहिले मतदार असलेले श्याम सरण नेगी यांनी आत्तापर्यंत ३३ वेळा मतदान केलं आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नौर या ठिकाणचे ते रहिवासी आहेत. बॅलेट पेपर ते ईव्हीएम हा सर्व प्रवास पाहिलेले ते मतदार ठरले.

देशातले सर्वात वयस्कर मतदार असलेले श्याम सरण नेगी यांनी पोस्टल प्रक्रियेने मतदान केलं. खरंतर श्याम सरण नेगी यांना मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करायचं होतं. मात्र त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून मतदानाचा फॉर्म भरून घेतला. १२ डी या फॉर्मद्वारे श्याम सरण नेगी यांनी मतदानाचा हक्क बजावला. आत्तापर्यंत नेगी यांनी ३३ वेळा मतदान केलं आहे.

१९५१ मध्ये त्यांनी नेगी यांनी केलं होतं पहिल्यांदा मतदान

१ जुलै १९१७ ला किन्नौर जिल्ह्यातील चिन्नी गावात ज्या गावाचं आत्ताचं नाव कल्पा आहे तिथे नेगी यांचा जन्म झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात १९५२ ला मतदान झालं होतं. मात्र किन्नौरसह हिमालयातल्या दुर्गम भागात २५ ऑक्टोबर १९५१ ला मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी श्याम सरण नेगी हे मतदान करणारे पहिले भारतीय ठरले. किन्नौर आणि हिमाचलमध्ये होणारी हिमवृष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी काही महिने आधी मतदान पार पडलं होतं. त्यावेळी मतदान करणारे पहिले भारतीय श्याम सरण नेगी हे होते. आज त्यांचं वयाच्या १०६ व्या वर्षी निधन झालं.

ऑक्टोबर १९५१ मध्ये श्याम सरण नेगी यांनी पहिल्यांदा लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान केलं. त्यानंतर त्यांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान केलं. आत्तापर्यंत त्यांनी ३३ वेळा मतदान केलं. मला मताची किंमत ठाऊक आहे. माझं शरीर थकलं तरीही माझ्या आत्मिक बळावर मी मतदान करण्यासाठी जातो आणि माझं भारतीय म्हणून जे कर्तव्य आहे ते बजावतो असं नेगी सांगत असत. हिमाचलमध्ये निवडणूक लागल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली. तसंच यावेळी मी मतदान केलं तर ते माझं शेवटचं मतदान असेल असंही ते म्हणाले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी पोस्टल प्रक्रियेद्वारे मतदान केलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

    follow whatsapp