मुंबई: मालदीवच्या सुट्टीवरून परतल्यानंतर अनुष्का शर्मा तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबत मंगळवारी अचानाक हॉस्पिटलमध्ये गेली असल्याचं समोर आलं आहे. सुट्टीवरून परत आल्यानंतर लगेचच या जोडप्याला हॉस्पिटलमध्ये जाताना पाहून आता अनेक जण अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा करु लागले आहेत. पण खरी गोष्ट ही आहे की, अनुष्का ही आपल्या फिजिओथेरपिस्टला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. ती गरोदर नाही.
ADVERTISEMENT
आदल्या दिवशी सुट्टीवरून मुंबईत परतल्यानंतर लगेचच अनुष्का आणि विराट कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात गेले. त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करत आहेत.
काही लोकांनी अनुष्काच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली तर काहींनी गर्भधारणेबद्दल अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता या जोडप्याने रुग्णालयात जाण्याचे कारण स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत गर्भधारणेचा अंदाज लावणाऱ्यांना नेमकं काय ते उत्तर मिळालं आहे.
मालदीवमधील अनुष्काचे खास फोटो
अनुष्का आणि विराटच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो अनुष्काने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मोनोकनीमध्ये समुद्रकिनारी सेल्फी घेत असलेल्या अनुष्काच्या खास फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहे. अनुष्काचे हे आनंदी फोटो तिच्या कुटुंबाच्या छान सुट्टीचा दाखला देत आहेत. अनुष्काने तिच्या सोलो फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, तिने हे फोटो स्वतः काढले आहेत.
अनुष्का शर्माचा करण जोहरच्या पार्टीत किलर लूक, सगळ्यांच्याच खिळल्या नजरा
चकदा एक्सप्रेसमधून अनुष्काचं पुनरागमन
वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास अनुष्का शर्मा ही लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी अनुष्काने खूप मेहनत घेतली आहे. तिने नेट सराव करताना आणि क्रिकेटच्या युक्त्या शिकत असलेले काही BTS फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे.
प्रेग्नसीनंतर अनुष्का मोठ्या पडद्यापासून लांब राहिली होती. आता मात्र, ती पुन्हा एकदा चित्रपटांच्या शूटींगसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे लवकरच ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
ADVERTISEMENT