राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाडांना अडकवण्याचा कुणाकडून प्रयत्न होतोय, अशीही चर्चा रंगली. जितेंद्र आव्हाडांनी काही ट्विट केले, मात्र स्पष्ट भाष्य केलं नाही. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ADVERTISEMENT
ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी रिदा रशीद तुम्हाला भेटल्यानंतर माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, असं म्हणत आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं अंगुली निर्देश केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मध्यतंरी हे सगळं झाल्यानंतर मी एकनाथ शिंदेंना भेटायला गेलो होतो. मी असा चाललेलो आणि सह्याद्रीमध्ये ते बसलेले होते. मी मुद्दाम हे सागतोय. मी त्यांना विचारलं की, माझ्यावर हे गुन्हे टाकण्याचं कारण काय? भोळा भाबडा माणूस आहे. मुख्यमंत्री आपले भोळे भाबडे आहेत. (उपरोधिक स्वरात) मला म्हणाले, ‘नाही जितेंद्र, तुला माहितीये ना मी कसा आहे? मी टाकेन का असं काही करून देईन असं कुणाला?’ अरे ठाण्यात जितेंद्र आव्हाडला अटक होतेय आणि तुम्हाला माहिती नाही, शक्य आहे का? महाराष्ट्रात कुठेही अशी पिन पडली तरी पहिली बातमी मुख्यमंत्र्यांना देतं एसआयडी.”
भगतसिंह कोश्यारींचा अमित शाहांकडे माफीनामा? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर म्हणाले…
रिदा रशीद तुम्हाला भेटल्यानंतर गुन्हा दाखल झाला; जितेंद्र आव्हाडांनी केला गंभीर आरोप
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तुम्ही सत्तेच्या वर्तुळात आत्ता आलात. मी सत्तेच्या वर्तुळात 90 सालापासून आहे, जेव्हापासून शरद पवार मुख्यमंत्री आहेत. तेव्हा हे येड्या गबाळ्याला सांगितलं तर ठिके, अरे मला काही माहितीच नव्हतं. रिदा रशीद तुम्हाला रात्री भेटली, त्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्याचा व्हिडीओ पण आहे आमच्याकडे. म्हणज महाभारतात जसं शिखंडीचा वापर करून युद्ध जिंकण्याचा प्रकार झाला, तसं एका बाईला पुढे करून माझा मुडदा पाडण्याचा विचार होता, पण आजकाल दुर्दैवाने व्हिडीओ आहेत. व्हिडीओने कामच करून टाकलं.”
शिंदे गटातल्या आमदारांनी चूक झाल्याचं केलं मान्य; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“मी नावच घेऊन सांगतो, अब्दुल सत्तार नावाचा मंत्री भेटला मला. तो म्हणाला, ‘भाई गाव में हमको इतनी गालिया पड रही है की तुमने क्या गंदा काम कर दिया. उसकी गलती क्या थी. तुमको उसने लडना नहीं होता, तो मत लडो मगर औरत को आगे करके ऐसा काम मत करो.’ मला त्यांचे (शिंदे गट) 20 आमदार भेटले ते म्हणाले, ‘आमचं चुकलं,” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलंय.
ADVERTISEMENT