ज्या इमारतीमधून संपूर्ण राज्याचा कारभार हाकला जातो त्या मंत्रालय परिसरात आज दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या कँटीन परिसरात एका ठिकाणी या दारुच्या बाटल्या सापडल्या. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची कार्यालय या मंत्रालयात आहेत.
ADVERTISEMENT
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंत्रालयाची इमारत ही एका प्रकारे किल्ला समजली जाते. मंत्रालयाच्या प्रत्येक गेटवर पोलिसांचा कडक पहारा असतो. तसेच आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाते. तसेच इमारतीच्या आतही सुरक्षाव्यवस्था मजबूत असल्यामुळे दारुच्या बाटल्या आत कशा आल्या याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मंत्रालयात कोणी नसताना छुप्या पद्धतीने पार्टीचं आयोजन केलं जात होतं का याबद्दलही प्रश्न विचारलं जात आहे.
सध्या ज्या भागात दारुच्या बाटल्या सापडला तो परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील भाजपने या प्रकरणी कठोर शब्दांत टीका केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणं ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. सध्या कोरोनामुळे लोकांना मर्यादीत स्वरुपात आत प्रवेश मिळत असताना दारुच्या बाटल्या आत कशा आणल्या गेल्या याचा तपास होणं गरजेचं असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.
Bombay high court चा सरकारला दणका! 11 वी प्रवेशासाठीची CET रद्द करण्याचा निर्णय
“या प्रकरणाची चौकशी होऊन जे कोणीही यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. परंतू यामधून राज्य सरकारची मानसिकता दिसून येते. हे सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे? दारु निर्माण करणाऱ्या कंपन्यांसाठी, श्रीमंतांसाठी, डान्सबार मालकांसाठी की सामान्य माणसांसाठी? या प्रश्नाचं उत्तर सामान्य जनतेला मिळायला हवं”, असं म्हणत दरेकर यांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT