मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचा (Corona Paitents) अक्षरश: स्फोट झाला आहे. कारण गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 68,331 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. याशिवाय आणखी चिंताजनक गोष्ट म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा (Corona Deaths) देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारण आज (18 एप्रिल) राज्यात तब्बल 503 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT
राज्यात 5 एप्रिपासून 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. इतर आस्थापने मात्र बंद ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, असं असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत तसंच मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
राज्यात आज 45,654 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 31,06,882 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 80.92 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 503 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.58 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,38,54,185 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 38,39,338 (16.1 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,75,518 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,529 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,70,388 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई (Mumbai) – 86 हजार 688
-
ठाणे (Thane) – 86 हजार 732
-
पुणे (Pune) – 1 लाख 22 हजार 486
-
नागपूर (Nagpur) – 73 हजार 485
-
नाशिक (Nashik)- 42 हजार 563
-
अहमदनगर (Ahmednagar) – 18 हजार 163
-
जळगाव (Jalgaon) – 12 हजार 795
-
औरंगाबाद (Aurnagabad)- 14 हजार 344
-
लातूर (Latur) – 16 हजार 953
-
नांदेड (Nanded)- 12 हजार 576
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 1 लाखांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय नागपुरात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. नागपूरमध्ये सध्या 73 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
मुंबईत दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 8 हजार 468 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 8 हजार 078 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 4 लाख 78 हजार 039 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 82 टक्के आहे. डबलिंग रेट 45 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT