Mahim Mazar Mumbai: राज ठाकरेंचा इशारा, ‘त्या’ बांधकाम कामावर चालवला जेसीबी!

मुंबई तक

• 10:26 PM • 22 Mar 2023

Mahim Mazar demolition: गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिम समुद्र किनाऱ्यावरील मजारीचा मुद्दा मांडला. अनधिकृतपणे काम हटवलं नाही, तर त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या कामावर जेसीबी चालवण्यात आला. सकाळीच या ठिकाणी जेसीबी पोहोचले होते. त्यानंतर बांधकाम हटवण्यात आलं. माहिम दर्ग्याला लागून […]

Mumbaitak
follow google news

Mahim Mazar demolition: गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिम समुद्र किनाऱ्यावरील मजारीचा मुद्दा मांडला. अनधिकृतपणे काम हटवलं नाही, तर त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या कामावर जेसीबी चालवण्यात आला. सकाळीच या ठिकाणी जेसीबी पोहोचले होते. त्यानंतर बांधकाम हटवण्यात आलं.

हे वाचलं का?

माहिम दर्ग्याला लागून असलेल्या अरबी समुद्रात 100 मीटर अंतरावर एक मजार असून, तिथे दर्गा बनवला जात असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. याप्रकरणात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई महापालिका आयुक्तांना इशारा दिला. एका महिन्याच्या आत हे बांधकाम हटवलं गेलं नाही, तर मनसे तिथे गणपती मंदिर बांधेल, असं राज ठाकरे म्हणाले.

गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या मनसे मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर प्रशासन रात्रीतूनच कामाला लागले.मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशान्वये निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यांनी तोडक काम करण्याचे आदेश काढले.

मुंबई निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात काय?

मुंबई शहर जिल्ह्याच्या हद्दीतील माहिम लगतच्या समुद्रामध्ये अनाधिकृतपणे अतिक्रमण करून बांधकाम चालू आहे, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे आली आहे. त्यामुळे सदरचे बांधकाम त्वरित निष्कासित करणे आवश्यक आहे. हे बांधकाम निष्कासित करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आलं आहे.

‘ती’ दर्गा हटवा, नाहीतर मंदिर उभारणार, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिम समुद्रातील बांधकामावर कारवाई करण्यासाठी उपजिल्हाधिकारी भागवत गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले आहे. भूमी अभिलेख अधीक्षक कृष्णात कणसे, नायब तहसीलदार अशोक सानप, सहाय्यक अधीक्षक प्रशांत चौधरी, महसूल सहाय्यक राजू खंडारे, परिरक्षण भूमापक पराग जाधव, परिरक्षण भूमापक संदिप लोकरे यांचा या पथकात समावेश आहे.

माहिम समुद्रातील मजार, सकाळी आठ वाजता कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासन सकाळीच कामाला लागले. सकाळी आठ वाजताच्या सुमारास बांधकाम हटवण्यासाठी जेसीबी किनाऱ्यावर पोहोचला होता. त्यानंतर अनाधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या ठिकाणी जेसीबी नेण्यात आला आणि बांधकाम हटवण्यात आलं.

    follow whatsapp