मालाड मध्ये इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला. मोहम्मद रफिक हे दूध आणण्यासाठी गेले होते. मात्र ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांचा मृत्यू झाला होता. मालवणी इमारत दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबातील नऊ लोक मृत्यूमुखी पडले. ही घटना ऐकून ते सून्न झाले आहेत. मुंबई तक ने त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
काय आहेत या नऊ जणांची नावं?
मोहम्मद शफीक
इशरत बानो
मोहम्मद तौसिफ
मोहम्मद तईश
अलिसा बानो
अलिना बानो
आरिफा बानो
अलफिसा बानो
रईसा बानो
अशा नऊ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 जण एकाच कुटुंबातले आहेत.
मुंबईतल्या मालाड भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात लोक जखमी झाले आहेत. मालाड पश्चिमेकडे असलेल्या मालवणी भागात ही इमारत होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमींवर उपचार सुरू असून घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ज्या ठिकाणी इमारत कोसळली तिथे मुंबई महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.
मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं. अशात मालाडमध्ये रात्री उशिराच्या सुमारास ही इमारत कोसळली. मालवणी भागात असलेली ही इमारत शेजी असलेल्या घरांवर कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील त्या ठिकाणी पोहचले. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली अशी माहिती त्यांनी दिली.
Malad Building Collapse: मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस
काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जे लोक जखमी झाले त्यांना शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचीही भेट उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांची विचारपूसही केली.
ADVERTISEMENT