नवी दिल्ली: कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर मिळालेल्या लस प्रमाणपत्रावर (Vaccine Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा जो फोटो लावण्यात आला आहे त्यावर विरोधकांच्या वतीने सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु आता राज्यसभेत (Rajya Sabha) आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) प्रमाणपत्रावर पीएम मोदींचा फोटो का लावण्यात आला आहे याचे नेमके कारण दिले आहे.
ADVERTISEMENT
आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी राज्यसभेत सांगितले की, कोव्हिड-19 (Covid-19) चे योग्य वर्तनाचे (appropriate behavior) पालन करणे हा या रोगाचा प्रसार रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तसेच लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींच्या संदेशासह फोटो असल्याने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास अधिक मदत करते.
लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींच्या फोटोसह नेमका काय संदेश आहे?
ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांना त्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. याच प्रमाणपत्रावर क्यूआर कोडसह पंतप्रधान मोदींचा फोटो देखील झापण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या फोटोच्या समोर त्यांच्या भाषणातील एक वाक्य देखील झापण्यात आलं आहे. ‘औषध सुद्धा आणि शिस्त सुद्धा… एकत्रितपणे भारत कोविड -19 ला हरवेल.’
याच वाक्याद्वारे आणि पंतप्रधान मोदींच्या फोटोमुळे लोकांमध्ये लसीविषयी जागरुकता निर्माण होईल असं राज्यमंत्री भारती पवार यांचं म्हणणं आहे.
‘प्रमाणपत्र WHO च्या निर्देशानुसारच’
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, ‘कोव्हिड-19 लसीकरण प्रमाणपत्रांचे स्वरूप प्रमाणित आहे आणि प्रमाणपत्रांवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे.’
काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी सरकारला असेही विचारले की, लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापणे आवश्यक आणि अनिवार्य आहे का?
ज्यावर उत्तर देताना मंत्री भारती पवार म्हणाल्या की, ‘साथीच्या रोगाचे बदलते स्वरूप पाहता योग्य कोव्हिडसंबंधी योग्य वर्तनाचे पालन करणं हा रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणून उदयास आला आहे. लसीकरण प्रमाणपत्रांमध्ये पंतप्रधानांच्या संदेशासह फोटो हा व्यापक जनहितासाठी छापण्यात आला आहे.’
‘लस घेतल्यानंतर देखील कोरोनासंबंधी योग्य नियम पाळणं गरजेचं आहे आणि त्याचसंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी संदेश आणि फोटो छापण्यात आला आहे.’
त्या पुढे असंही म्हणाल्या की, ‘लोकांपर्यंत असे महत्त्वाचे संदेश सर्वात प्रभावी पद्धतीने पोहोचवणे ही सरकारची नैतिक आणि धोरणात्मक जबाबदारी आहे.’
‘ महाराष्ट्र सरकार Vaccination Certificate वरून मोदींचा फोटो हटवणार नाही, वेगळ्या APP ची संमती द्या’
‘या’ प्रश्नाचे उत्तर भारती पवार यांनी दिले नाही!
दरम्यान, यावेळी कुमार केतकर असंही म्हणाले की, इतर कोणत्या देशाने प्रमाणपत्रावर आपल्या पंतप्रधानांचे छायाचित्र छापलेले नाही.’ याशिवाय कुमार केतकर यांनी यावेळी आणखी एक प्रश्न विचारला ज्याला मात्र उत्तर देण्यात आलं नाही. ज्यामध्ये त्यांनी विचारले होते की, ‘पोलिओ, कांजण्या इत्यादी कोणत्याही लसींच्या प्रमाणपत्रांवर याआधी पंतप्रधानांचे छायाचित्र छापणे हे कोणत्याही सरकारने आवश्यक किंवा अनिवार्य केलेले आहे का?
ADVERTISEMENT