Modi Surname case : राहुल गांधींना ‘मोदी आडनाव’ पुन्हा अडकवणार?

मुंबई तक

12 Apr 2023 (अपडेटेड: 12 Apr 2023, 07:16 AM)

Rahul Gandhi Modi Surname case : मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. नुकतंच सूरत कोर्टाने (Surat Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आता पाटण्यात या प्रकरणात राहुल गांधी यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

Modi surname remark Patna court has asked Congress leader Rahul Gandhi to appear in court on April 12

Modi surname remark Patna court has asked Congress leader Rahul Gandhi to appear in court on April 12

follow google news

Rahul Gandhi Modi Surname case : मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. नुकतंच सूरत कोर्टाने (Surat Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आता पाटण्यात या प्रकरणात राहुल गांधी यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पाटणा कोर्टात (Patna court) राहुल गांधी यांना दिलासा मिळतो की त्यांच्या अडचणी वाढतात? हे पाहावे लागणार आहे. (modi surname case trap rahul gandhi again what is the case patna mpmla court)

हे वाचलं का?

बिहारच्या पाटणा न्यायालयात (Patna court) आज राहुल गांधी (Rahul Gandhi) हजर राहणार आहेत. हे प्रकरण सूरत कोर्टाप्रमाणेच आहे. यामध्ये राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर त्यांना जामीनही मिळाला होता. सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते’ असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आता राहुल गांधी यांना पाटण्याच्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे. या प्रकरणात आता काय निकाल लागतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : MSC Bank scam case : ईडीची अजित पवार, सुनेत्रा पवारांना क्लिनचीट!

‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते’ असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी (Sushil Modi) यांनी पाटण्यात राहुल गांधी विरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात आज त्यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे.सुत्रांच्या माहितीनुसार,राहुल गांधी आज 12 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहू शकत नाहीत. या प्रकरणात राहुल गांधी यांचे वकील अंशुल कुमार त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी अणखीण एक तारीख मागू शकतात, अशी माहिती आहे.

हे ही वाचा : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अंजली दमानियांची स्फोटक पोस्ट

दरम्यानत भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी (Sushil Modi) यांनी 2019 मध्ये राहुल गांधींविरोधात हा खटला दाखल केला होता. बिहारमध्ये दाखल केलेल्या या खटल्यात सुशील कुमार मोदी यांच्यासह पाच साक्षीदार आहेत. तर ऑगस्ट 2022 मध्ये सुशील मोदी हे शेवटचे साक्षीदार होते.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणूकी दरम्यान 13 एप्रिल रोजी कर्नाटक येथील बेलूरच्या ककोरमधील प्रचारसभेत राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते’ असे विधान केले होते. या वक्तव्याचा आक्षेप घेत सुशील मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप घेत मानहानीचा खटला दाखल केला होता.

सूरत कोर्टात काय झालं होतं?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 2019 मध्ये कर्नाटकमध्ये एक विधान केलं होतं, यात त्यांनी म्हटलं होतं की, “सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?” त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांना तात्काळ जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

    follow whatsapp