Mood of the Nation । Lok sabha Election । MVA vs BJP : आजघडीला लोकसभेच्या निवडणुका (Lok sabha election) झाल्या, तर महाराष्ट्रातील (Maharashtra) निकाल काय असतील? महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) वरचढ ठरेल की, भाजप (Bjp) प्रणित एनडीए (NDA)? याबद्दल इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षण (india today c voter survey) केलं. त्याची आकडेवारी भाजपची (Bjp) चिंता वाढवणारी आहे, तर महाविकास आघाडी (MVA) दिलासा देणारी आहे. आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप प्रणित एनडीए आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात? याचा घेतलेला आढावा… (India Today-C voter survey of Mood of the Nation 2023)
ADVERTISEMENT
1) आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती जागा मिळतील?
इंडिया डुटे-C वोटर सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला तब्बल 298 जागा मिळतील. तर UPA ला 153 जागा मिळतील.
2) आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती व्होट शेअर मिळतील?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA चा व्होट शेअर हा तब्बल 42.8 टक्के एवढा असेल. तर UPA चा व्होट शेअर हा 29.6 टक्के एवढा राहील.
3) आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा किमान 10 ते 11 जागा अधिक मिळू शकतात. म्हणजेच भाजपला 284 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 68 आणि इतरांना मिळून 191 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.
4) आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाचा किती व्होट शेअर असेल?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपचा व्होट शेअर हा 38.5 टक्के एवढा असू शकतो. तर काँग्रेसचा व्होट शेअर 22.2 टक्के आणि इतरांचा व्होट शेअर हा 39.3 टक्के एवढा राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
5) कोणत्या राज्यांमध्ये NDA च्या जागांची काय असेल स्थिती?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या राज्यांमध्ये त्यांच्या जागा कमी होऊ शकतात. तर दुसरीकडे आसाम, तेलंगणा, प. बंगाल आणि उ. प्रदेशमध्ये मात्र NDA च्या जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
6) आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात NDA आणि UPA ला किती जागा मिळतील?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात NDA (भाजप, शिंदे गट आणि RPI) ला फक्त 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर UPA (मविआ) ला तब्बल 34 जागा मिळू शकतात.
7) देशातील जनता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर किती खूश?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील 45.8 टक्के जनतेच्या मते पंतप्रधान म्हणून मोदींची कामगिरी ही उत्कृष्ट आहे. तर 25.7 टक्के लोकांच्या मते त्यांची कामगिरी उत्तम आहे. तर 10.1 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, मोदींची कामगिरी ही साधारण आहे. तर 7.4 टक्के जनतेच्या मते पंतप्रधान मोदींची कामगिरी ही खराब आहे. तर 8.8 टक्के जनतेला त्यांची कामगिरी ही अतिखराब वाटते.
8) NDA सरकारची मोठी कामगिरी कोणती?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार NDA सरकारची सर्वात मोठी कामगिरी ही कोव्हिडमध्ये हाताळलेली स्थिती आहे. 20.4 जनतेच्या मते NDA सरकारने कोव्हिडमधील परिस्थिती योग्यरित्या हाताळली. तर 13.8 टक्के लोकांच्या मते मोदी सरकारची दुसरी मोठी कामगिरी ही कलम 370 रद्द करण्याची आहे. याशिवाय 11.5 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, राम मंदिर ही आणखी एक NDA सरकारची मोठी कामगिरी आहे. तर 8.3 लोकांचं म्हणणं आहे की, समाजकल्याण योजना ही देखील NDA सरकारने केलेली मोठी योजना आहे.
9) NDA सरकारचं अपयश काय?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार NDA सरकारचं सर्वात मोठं अपयश म्हणजे देशातील वाढती महागाई. 25 टक्के लोकांच्या मते महागाई हे NDA सरकारचं अपयश आहे. या पाठोपाठ 17 टक्के लोकांच्या मते बेरोजगारी हे NDA सरकारचं दुसरं अपयश आहे. तर 8 टक्के लोकांना वाटतं की, सरकारने कोव्हिड स्थिती ज्या प्रकारे हातातळली ते त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे. तर 5.5 टक्के लोकांच्या मते नोटाबंदी हे NDA सरकारचं अपयश आहे.
10) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे का?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार 44.2 टक्के लोकांना वाटतं की, सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. तर 41.4 टक्के लोकांच्या मते, सगळीच सरकारं ही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतात.
11) भ्रष्टाचार कमी करण्यात मोदी सरकारला यश आलं?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार 53 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, मोदी सरकारला भ्रष्टाचार कमी करण्यात यश आलं आहे. तर 41 टक्के लोकांच्या मते मोदी सरकारला भ्रष्टाचार कमी करता आलेला नाही.
12) भारतात आज घडीला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत?
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचं नाव समोर आलं आहे. त्यांना तब्बल 39 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली असून लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.
ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर (7 टक्के पसंती), M. K. स्टॅलिन चौथ्या क्रमांकावर (5 टक्के पसंती), नवीन पटनायक पाचव्या क्रमांकावर (3 टक्के पसंती), हेमंत बिसवा सरमा सहाव्या क्रमांकावर (3 टक्के पसंती), शिवराज सिंह चौहान सातव्या क्रमाकांवर (2.4 टक्के पसंती) आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना फक्त 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.
ADVERTISEMENT