मुंबई-नागपुरात Corona चा कहर सुरुच, दिवसभरात तीन हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबई तक

• 03:12 PM • 21 Mar 2021

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे असं दिसून येतं आहे. मुंबईत ३ हजार ७७५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात १६४७ जण मुंबईत कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात १० रूग्णांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईत एकूण ३ लाख ६२ हजार ६५४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी एकूण ३ लाख २६ हजार ७०८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे असं दिसून येतं आहे. मुंबईत ३ हजार ७७५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात १६४७ जण मुंबईत कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात १० रूग्णांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईत एकूण ३ लाख ६२ हजार ६५४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी एकूण ३ लाख २६ हजार ७०८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण ११ हजार ५८२ रूग्णांचा कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत २३ हजार ४४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

कोरोना काळात फेअरवेल पार्टी, मुंबईतील कॉलेजला कारणे दाखवा नोटीस

नागपुरात ३ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

नागपुरात चोवीस तासात ३ हजार ६१४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील २४ तासांमध्ये ३२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात १८५९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नागपुरात आत्तापर्यंत एकूण १ लाख ९३ हजार ८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ५९ हजार १०८ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. आज घडीला नागपुरात २९ हजार ३४८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर नागपुरात आत्तापर्यंत एकूण ४ हजार ६२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Corona रुग्ण वाढूनही नागपुरात लॉकडाऊनचा फज्जा, रस्त्यांवर नागरिकांची गर्दी

नागपुरात कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र नागपूरकर लॉकडाऊनचे नियम पाळत नसल्याचं चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीच ड्रोनने नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतही गर्दी होताना दिसते आहे. तसंच चित्र नागपुरातही आहे.

    follow whatsapp