राज्यभरात ब्रेक द चेन आणि विविध शहरात जनता कर्फ्यू, लॉकडाउन सारख्या निर्बंधांमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्राला यश काही प्रमाणात टप्प्यात दिसायला लागलं आहे. राज्यात दररोज रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होत नसला तरीही रुग्ण कोरोनातून सावरण्याचं प्रमाण आश्वासकरित्या वाढलं आहे. आज महाराष्ट्रात ६२ हजार १९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६३ हजार ८४२ रुग्ण कोरोनामधून सावरले आहेत.
ADVERTISEMENT
राज्याचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ८४ टक्क्यांच्या घरात आहे. तसेच ८५३ रुग्णांची कोरोनासोबतची झुंज आज अपयशी ठरली आहे. दुसरीकडे मुंबईत नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण आटोक्यात आलं असून आज शहरात ३ हजार ५६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ६९ जणांना कोरोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९० टक्क्यांवर पोहचलं असून महापालिका प्रशासन राबवत असलेल्या उपाययोजनांना यश मिळताना दिसत आहे.
दरम्यान कोविन अॅपवर नोंदणी (registration ) केली नसेल तर लस मिळणार नाही असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने तसा आदेशच काढला आहे. ज्या कुणालाही कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठीची लस घ्यायची आहे त्या सगळ्यांनी आधी Cowin या पोर्टलवर आधी रजिस्ट्रेशन करावं. तसंच रजिस्ट्रेशन केल्यानंतर लस घेण्यासाठीचा Slot ही चेक करावा असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कुणाला सूट देण्यात येईल?
45 वर्षे आणि त्यावरील वयाचे नागरिक ज्यांचा Covaxin या लसीचा दुसरा डोस बाकी आहे. त्यांनी लस घ्यायला येताना पहिला डोस मिळाल्याचं प्रमाणपत्र आणणं आवश्यक आहे. सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी सोबत असणं आवश्यक आहे.
आरोग्य सेवांसाठी काम करणारे कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांच्या दुसऱ्या डोससाठी. मग तो कोव्हिशिल्डचा असो किंवा कोव्हॅक्सिनचा.
हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचा जर पहिला डोस राहिला असेल तर त्यांच्यासाठी.
हे तीन निकष सोडून इतर सगळ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करावीच लागणार आहे.
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण ही घोषणा मोदी सरकारने तयारीशिवायच केली?
ADVERTISEMENT