प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
यवतमाळहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बस आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला. त्यानंतर या बसने पेट घेतला आणि ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. नाशिक औरंगाबाद रोडवरच्या मिरची चौकात ही घटना आज पहाटे ४.३० च्या सुमारास घडली. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे. या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नावं समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
काय आहेत नाशिकच्या बस अपघातातल्या जखमींची नावं?
भगवान श्रीपत मनोर
सतीश राठोड
गजकुमार शहाणे
त्रिशला गजकुमार शहाणे
अजय देवगन
अश्विनी जाधव
सचिन जाधव
राजीव जाधव
निलेश राठोड
अमिता चौघुले
पायल शिंदे
चेतन शिंदे
किरण चौगुले
हंसराज बागुल
जयंतुभाई पठाण
रेहाना पठाण
राहत शेर पठाण
फरिन खान पठाण
मालु अनिल चव्हाण
अनिल चव्हाण
भगवंत भिसे
प्रज्ञा जाधव
ज्ञानदेव राठोड
सूर्या राठोड
निकिता राठोड
स्वरा राठोड
साहेबराव जाधव
दीपक शिंदे
राजू शेख इस्माईल
अंबादास वाघमारे
अमित कुमार
पिराजी धाडे
राजू जाधव
पूजा गायकवाड
आर्यन गायकवाड
मयंक गायकवाड
गणेश लांडगे
प्रवासी अनिता चौधरी यांनी काय सांगितलं?
अशी जखमींची नावं समोर आली आहे. पहाटेच्या सुमाराला आम्ही सगळे लक्झरी बसमध्ये झोपलो होतो तेव्हा अचानक मोठा आवाज झाला आणि बसला आग लागली. यावेळी मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचवून बाहेर पडले. माझं नशीब चांगलं म्हणून मी आणि मुलगी वाचलो असं अनिता चौधरी यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT