NCB ने Aryan Khan ची केस गरजेपेक्षा जास्त खेचली – वकील मुकुल रोहतगी यांचा दावा

मुंबई तक

• 01:42 PM • 30 Oct 2021

आर्यन खानला मुंबई हायकोर्टात जामीन मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी NCB च्या तपासावर आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहतगी यांनी आर्खन खान प्रकरणातील न्यायालयीन डावपेचांची बाजू उलगडून दाखवली. आर्यन खानविरुद्ध NCB कडे कोणताही पुरावा नव्हता आणि त्यांनी गरजेपेक्षा जास्त केस खेचली असं वक्तव्य […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खानला मुंबई हायकोर्टात जामीन मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी NCB च्या तपासावर आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहतगी यांनी आर्खन खान प्रकरणातील न्यायालयीन डावपेचांची बाजू उलगडून दाखवली.

हे वाचलं का?

आर्यन खानविरुद्ध NCB कडे कोणताही पुरावा नव्हता आणि त्यांनी गरजेपेक्षा जास्त केस खेचली असं वक्तव्य रोहतगी यांनी केलं आहे. या प्रकरणात दोन महत्वाचे पैलू निगडीत असल्याचं रोहतगी यांनी सांगितलं. यातला पहिला आणि महत्वाचा पैलू म्हणजे आर्यन खानजवळ कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नव्हतं आणि दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे तो अरबाझ मर्चंटसोबत त्या क्रुझवर गेला होता.

आर्यनने ड्रग्ज सेवन केल्याचा, मोठ्या प्रमाणात बाळगल्याचा किंवा पेडलिंग केल्याचा कोणताही पुरावा नव्हता. तरीही NCB ने commercial quantity च्या आधारावर ही केस तयार केली, जी नंतर गरजेपेक्षा जास्त खेचत गेली असंही रोहतगी यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात कोणत्याही प्रकारे ड्रग्ज सिंडीकेट सहभागी असल्याचं सांगणारा एकही पुरावा NCB कडे नव्हता. सेशन्स कोर्टातही माहिती असूनही ड्रग्ज बाळगण्याचा मुद्दा हा अवास्तव खेचला गेल्याचं रोहतगी म्हणाले.

बहुतांश प्रकरणांमध्ये न्यायालय आरोपीला जामीन नाकारतात पण अनेकदा लोकं हे विसरतात की १९७८ साली सर्वोच्च न्यायालयाने ‘bail is the rule and jail is the exception’ असं सांगितलं होतं. जर एखादा व्यक्ती अत्यल्प प्रमाणात अमली पदार्थाचं सेवन करत असेल आणि ही गोष्ट त्याने मान्य केली तर त्याला अटक करता येत नाही. जर त्या व्यक्तीने व्यसनमुक्ती केंद्रात जायची तयारी दाखवली तर त्याच्यावर खटलाही चालवता येत नाही. जर या गोष्टी करण्यासाठी त्याने नकार दिला तर कारवाई होऊ शकते, २००१ साली झालेल्या कायद्यात हेच म्हटलंय. परंतू दुर्दैवाने आता याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि सर्वांना एकाच चष्म्यातून पाहिलं जातं, असंही रोहतगी यांनी सांगितलं.

Aryan Khan: आर्यन खान 28 दिवसांनी ‘मन्नत’वर परतला, जाणून घ्या ड्रग्ज प्रकरणाची संपूर्ण Timeline

आपल्याला या प्रकरणात मोठ्या सूत्रधारांना पकडायचं आहे. यापैकी अनेक अमली पदार्थ हे भारताच्या सीमेवरुन आत आणलं जातं. तुम्ही अशा लोकांना पकडा आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या. इकडे तुम्ही ५-७ मुलांना पकडलंत, नंतर एक महिना गेला. NCB ला यामध्ये काय सापडलं? काहीच नाही…असं म्हणून रोहतगी यांनी NCB च्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. काही महत्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी काही ठराविक लोकांना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही रोहतगी म्हणाले.

Cruise Drugs Case : अटक झालेल्या २० आरोपींची आताची स्थिती काय आहे? जाणून घ्या…

यावेळी रोहतगी यांनी केंद्रीय तपासयंत्रणा आणि सरकारला महत्वाचा सल्ला दिला आहे. “या घटनेत सरकारला दोष देणं योग्य ठरणार नाही. सरकार आणि संसद यांच्यात एकवाक्यता असते. माझ्यामते तपास यंत्रणांना थोडसं आत्मपरीक्षण करायची गरज आहे. लोकांना अटक करुन खटला सुरु व्हायच्या आधी शिक्षा द्यायची हा कायद्याचा उद्देष नाही. परंतू सध्या तपास यंत्रणा अशाच पद्धतीने काम करत आहेत. अशावेळी सरकारने तपास यंत्रणांशी सल्लामसलत करुन त्या खरंच कायद्यातील तरतुदींप्रमाणे काम करत आहेत का हे तपासणं गरजेचं आहे.”

ज्या क्षणी तपासयंत्रणांना आपली खरी जबाबदारी समजेल, त्यावेळी जेलमध्ये कैद्यांची गर्दी कमी होईल आणि कोर्टात निष्कारण खटल्यांची संख्या वाढणार नाही. अशा निष्कारण खटल्यांमध्ये लक्ष घालण्यापेक्षा कोर्टाला अनेक महत्वाची काम करायची असतात असंही रोहतगी म्हणाले.

    follow whatsapp