मोहित कंबोज हा कुणीही भविष्यकार नाही. हा प्रेस कॉन्फरन्स घेणार, काहीतरी जुने घोटाळे काढणार आणि महाराष्ट्राचं वातावरण खराब करणार. मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का? चौकशी करायची असेल तर त्याचीच आधी चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार म्हणजेच तुरुंगात जाणार आहे असे संकेत दिले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली आहे.
ADVERTISEMENT
“राष्ट्रवादीचा बडा नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार” मोहित कंबोज यांचा इशारा कुणाकडे?
काय म्हटलं आहे अमोल मिटकरी यांनी?
मोहित कंबोज हा काही तत्त्ववेत्ता किंवा भविष्य सांगणारा नाही. हा प्रेस कॉन्फरन्स घेणार काहीतरी जुने घोटाळे बाहेर काढणार आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणार. राज्यात शेतकऱ्यांवर संकट आलं आहे त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. भंडाऱ्यात दुर्दैवी घटना घडली आहे त्याबाबत हे महाशय बोलत नाहीत असाही टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
काय आहे मोहित कंबोज यांचं ट्विट?
Save This Tweet राष्ट्रवादीचा एक एकदम बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटणार या आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी केलं आहे. आता हा बडा नेता नेमका कोण? हे पाहणं महत्त्वाचं आहे. मोहित कंबोज हे नेमका कुणाकडे इशारा करत आहेत? याचीही चर्चा ट्विटरवर रंगली आहे.
मोहित कंबोज यांच्यावर अमोल मिटकरी यांची टीका
मोहित कंबोज कोण आहे, तो कुणाच्या इशाऱ्यावर काम करतो हे महाराष्ट्राला माहित आहे. लष्कर ए देवेंद्र मधला हा भाजपचा भोंगा आहे. जीएसटी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोहित कंबोज का बोलत नाही? ईडी कुठे धाड टाकणार असेल आणि ते जर मोहित कंबोजला माहित असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी अमोल मिटकरी यांनी केली. एवढंच नाही तर मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का असाही सवाल अमोल मिटकरी यांनी केला.
ADVERTISEMENT