शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का? असा प्रश्न भाजपचे नेते निलेश राणे यांनी विचारला आहे. चालत्या कारमध्ये पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे हे लोक कोण आहेत? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर लावण्यात आले आहे. ही घटना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरची आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का? असं ट्विट करत निलेश राणे यांनी हा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर यासंदर्भातला एक व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे व्हिडीओमध्ये?
शिवसेनेचा लोगो असलेल्या एका कारमध्ये दोन व्यक्ती पिस्तुल बाहेर काढून दाखवत आहेत. या कारवर शिवसेनेचा लोगो आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सर्वात आधी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यावर प्रश्न विचारला आहे. तसंच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी असंही जलील यांनी म्हटलं आहे. आता हाच व्हिडीओ पोस्ट करून निलेश राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.
पाहा व्हिडीओ
काय म्हटलं आहे इम्तियाज जलील यांनी?
“मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या कारसाठी मार्गक्रमण करत आहेत. त्यावेळी ते रिव्हॉल्वरचं ब्रांडिंग करत होते. गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक या अधर्माची दखल घेऊ शकतात. वाहनावर असलेला लोगो सर्व काही सांगून जातो आहे” असं म्हणत जलील यांनी हा व्हिडीओ ट्विट केला होता. तसंच गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षकांनी यामध्ये लक्ष घालावं अशीही मागणी केली आहे. आता यासंदर्भात निलेश राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT