ADVERTISEMENT
ब्यूटी ई-कॉमर्स कंपनी Nykaa IPO च्या जबरदस्त यशामुळे कंपनीच्या प्रमोटर फाल्गुनी नायर यांचे सर्व बाजूंनी कौतुक होत आहे.
फाल्गुनी नायर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ट्रस्ट ऑफिसच्या नायकामध्ये सामूहिक संपत्ती आता 54,831 कोटी रुपये (सुमारे 7.5 अब्ज डॉलर) झाली आहे.
या IPOपूर्वी नायर आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती केवळ 27,962 कोटी रुपये होती.
आयपीओनंतर आता या कंपनीतील नायर कुटुंबीयांच्या ट्रस्टची हिस्सेदारी 22.04 टक्क्यांवर आली आहे.
फाल्गुनी नायर यांना आता Bloomberg Billionaires Index मध्ये स्थान मिळाले आहे.
ब्लूमबर्गने त्यांचे वर्णन भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती म्हणून केले आहे.
Nykaa ने 2014 मध्ये पहिले फिजिकल स्टोअर सुरू केले होते. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत FSN ई-कॉमर्सची देशभरातील 40 शहरांमध्ये 80 स्टोअर्स आहेत.
ADVERTISEMENT