कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सतर्कता बाळगली जात असून, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महानगरांसह इतर जिल्ह्यांतही सावधगिरी बाळगली जात आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 318 जण परदेशातून आले असून, त्यापैकी 12 जणांचा अजूनही ठिकाणा सापडत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
ADVERTISEMENT
परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या 318 नागरिकांपैकी 306 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. तर इतर 12 नागरिकांनी दिलेले पत्ते अपूर्ण आहेत, तर काहींची घरं बंद आढळून आली आहेत. काही प्रवाशांचे दूरध्वनी बंद असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
इंग्लंडहून नागपूरला आलेल्या आई आणि मुलीला कोरोना , जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले नमुने
परदेशातून आलेल्या या प्रवाशांचाही लवकरच शोध घेतला जाईल. या 12 नागरिकांपैकी बहुतांश डोंबिवलीतील रहिवासी आहेत. 1 दक्षिण आफ्रिका, 4 नायजेरिया, 1 रशिया, 1 नेपाळ, 2 दुबईहून आलेले आहेत. आतापर्यंत विदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 8 नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तर एका नागरिकाचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. 9 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं महापालिका प्रशासनाने म्हटलं आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या यंत्रणेनं खबरदारी आणि उपाययोजनांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत विदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 318 नागरिकांपैकी 306 प्रवाशांचा शोध घेतला आहे. अपूर्ण पत्ते असलेल्या नागरिकांची यादी शासनास परत पाठवून त्यांचे पूर्ण पत्ते घेतले जाणार आहेत आणि ज्या नागरिकांची घरे बंद आढळून आली आहेत, त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पुन्हा भेट देऊन पाठपुरावा केला जात आहे, असं महापालिककेकडून सांगण्यात आलं.
विदेशातून कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. लो रिस्क (कमी धोक्याचे देश) आणि हाय रिस्क (अति धोक्याचे देश) देशातून येणाऱ्या व्यक्तींना 7 दिवसाचे गृह विलगीकरण बंधनकारक आहे. या 7 दिवसांत नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधून फोनद्वारे संपर्क साधण्यासह केडीएमसीचे मेडिकल ऑफिसरही त्याठिकाणी सरप्राईज व्हिजिट करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
Omicron ला रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊनची गरज? पाहा तज्ज्ञांचं म्हणणं काय
8व्या दिवशी त्यांची कोविड टेस्ट होणार आहे. त्यात निगेटिव्ह आले तरीही परत ७ दिवसांचे गृह विलगीकरण आणि पॉझिटिव्ह आल्यास केडीएमसीच्या संस्थात्मक विलगीकरण केले जाईल. यात उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT