मुंबई: राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे पुन्हा घेण्यात येणार आहेत. महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे.
याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराची स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपलं वर्ष वाया जाण्याची भीती सतावत होती. मात्र, राज्य सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन सीईटी परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची घोषणा केली आहे.
गुलाब वादळामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळाची निर्मिती झाली. ज्या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक भागात दिसत आहे. त्यातही मराठवाड्यात यामुळे अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे.
अनेक ठिकाणी अद्यापही पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या टीमकडून बचाव कार्य सुरु आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी या टीम शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
दुसरीकडे अनेक धरणं पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना पावसांचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.
Cyclone Gulab : मराठवाड्यात हाहाकार! नद्यांचा रौद्रवतार, धरणं तुडुंब; मदतकार्याला वेग
मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज
गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईत आज (29 सप्टेंबर) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून, आज 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून पावसाचा जोर वाढणार आहे. असा अंदाज हवामान खात्यासह मुंबई महापालिकेन देखील वर्तवला आहे.
ADVERTISEMENT