देशात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. अशा परिस्थितीत सरकारकडून सातत्याने मास्क, सॅनिटायझर तसंच सोशल डिस्टंसिग याचं पालन करण्यास सांगण्यात येतंय. मात्र तरीही अनेकजण विनामास्क फिरताना दिसतात. यासाठीच आता भारतीय रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केलीये. ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर मास्क न घातलेल्यांकडून 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.
ADVERTISEMENT
यासंदर्भात भारतीय रेल्वेने निवेदन जारी केलंय. या जारी निवेदनात म्हटल्याप्रमाणे, “मास्क न घातल्याबद्दल दंड करण्याचे आदेश पुढील सहा महिने लागू राहतील. कोव्हिड 19चा प्रसार थांबवण्यासाठी रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर विनानास्क आढळल्यास 500 रूपयांचा दंड ठोठावला जाणार.”
दरम्यान रेल्वेच्या परिसरात किंवा रेल्वेमध्ये थुंकणाऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे. रेल्वेने आता 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवाशांना योग्य प्रकारे मास्क घालण्याचे, नियमितपणे हात धुण्याचं, सॅनिटायझर वापराचे आणि सोशल डिस्टंसिंग राखण्याचे आवाहन केलं आहे.
देशात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मात्र, तरीही अनेकजण कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने महत्वाची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT