सांगलीत भयावह स्थिती ! मालवाहू रिक्षेत ऑक्सिजन लावून पेशंटची बेड शोधण्यासाठी ससेहोलपट

मुंबई तक

• 01:24 PM • 03 May 2021

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ काही केल्या कमी होत नाहीये. या वाढत्या रुग्णसंख्येचा राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येताना दिसत आहे. अनेक शहरात रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. सांगलीत एका व्यक्तीवर आपल्या पेशंटला मालवाहू रिक्षेत झोपवून ऑक्सिजन लावत शहरभर बेड शोधण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली. सांगलीच्या खटाव भागात राहणाऱ्या विमल […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ काही केल्या कमी होत नाहीये. या वाढत्या रुग्णसंख्येचा राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येताना दिसत आहे. अनेक शहरात रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. सांगलीत एका व्यक्तीवर आपल्या पेशंटला मालवाहू रिक्षेत झोपवून ऑक्सिजन लावत शहरभर बेड शोधण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली.

हे वाचलं का?

सांगलीच्या खटाव भागात राहणाऱ्या विमल पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी व्हायला लागल्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ ऑक्सिजनची सोय करुन बेड शोधण्यास सुरुवात केली. परंतू सध्याचं लॉकडाउन आणि बेड्सची कमतरता पाहता विमल पवार यांचे नातेवाईकांनी त्यांना मालवाहू रिक्षेत झोपवून शहरभर बेड्सची शोधाशोध करायला सुरुवात केली.

बऱ्याच ठिकाणी शोधमोहीम गेल्यानंतरही विमल पवार यांना बेड उपलब्ध झाला नाही. अखेरीस पवार यांच्या नातेवाईकांनी रिक्षा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आणून उभी केली. यानंतर सुधीर गाडगीळ यांनी विविधी हॉस्पिटल्समध्ये चौकशी करुन विमल पवार यांच्यासाठी एका बेडची सोय करुन दिली. विमल पवार यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय.

बारामतीत बुधवारपासून ७ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याशी संवाद साधत असताना, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत करण्यात आलेल्या वाढीबद्दल माहिती दिली. ज्यात बेड्सच्या संख्येतही वाढ करण्यात येत असल्याचं ठाकरेंनी सांगितलं. विमल पवार यांना बेड मिळाला असला तरीही एक बेड मिळवण्यासाठी करावी लागलेली वणवण ही राज्यातल्या खडतर परिस्थितीचं चित्र दाखवणारी आहे.

औरंगाबाद : जेव्हा न्यायालय सरकारच्या लॉकडाउन नियमांची पोलखोल करतं

    follow whatsapp