पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग दहाव्या दिवशी वाढ

मुंबई तक

• 05:52 AM • 18 Feb 2021

मुंबई तकः पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. ज्याने पेट्रोलची किंमत आता 96 रुपये तर डिझेलची किंमत 90 च्या जवळ पोहोचली आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर 98.19 पैसे एवढा झाला आहे. आज कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 34 पैसे डिझेलमध्ये 32 पैशांची वाढ केली आहे. मुंबईत ग्राहकांना एक लिटर डिझेलसाठी 87.32 पैसे मोजावे लागणार […]

Mumbaitak
follow google news

मुंबई तकः पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. ज्याने पेट्रोलची किंमत आता 96 रुपये तर डिझेलची किंमत 90 च्या जवळ पोहोचली आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर 98.19 पैसे एवढा झाला आहे.

हे वाचलं का?

आज कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 34 पैसे डिझेलमध्ये 32 पैशांची वाढ केली आहे. मुंबईत ग्राहकांना एक लिटर डिझेलसाठी 87.32 पैसे मोजावे लागणार आहेत. तर, एक लिटर पेट्रोलसाठी 96.32 पैसे भरावे लागणार आहेत. राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोल 89.88 पैसे तर डिझेलसाठी 80.27 पैसे भरावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसात सलग वाढणाऱ्या इंधनांच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. एकीकडे रेल्वेच्या वेळांवर अजूनही सर्वसामान्यांसाठी निर्बंध आहेत. तर, दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता खासगी वाहतुकीचा पर्याय लोकांना सुरक्षित वाटतो. पण वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे त्याचे दरही वाढले आहेत. ज्याचा फटका सामान्यांच्या खिशाला पडतो आहे.

एकीककडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इंधनाच्या बदलत्या पर्यायाकडे लक्ष वेधलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना विद्यूत इंधनाकडे पर्यायी इंधन म्हणून प्राधान्य देण्याचा सरकार विचार करत असल्याचे सांगितले. तसंच यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मिती जोरदार सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितलं.

    follow whatsapp