फोन टॅपिंग प्रकरण गंभीर, रश्मी शुक्लांनी महाराष्ट्राची बदनामी केली असं आता जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगचं कुभांड रचलं आहे, त्याबद्दल कॅबिनेटच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांनी संताप व्यक्त केला असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा कट करण्यात येतो आहे. फोन टॅपिंग प्रकरणासाठी संमती घेतलं नव्हती. संमती न घेता त्यांनी फोन टॅप केले असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. फोन टॅपिंगसाठी ज्यांच्या नंबरबाबत संमती घेतली होती त्या नंबर्सचे फोन टॅपच झालेले नाहीत असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
‘भाजपच्या एजंट’ असा आरोप झालेल्या रश्मी शुक्ला कोण?
सीताराम कुंटे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची संमती घेण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांनी अनेक महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केले असतील असा संशय आम्हाला आहे. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारचा विश्वासघात केला. आम्ही जो काही विश्वास त्यांच्यावर दाखवला होता त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?
२० मार्चला म्हणजेच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये त्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यातला एक आरोप हा होता की अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते. या आरोपामुळे खळबळ उडाली होती. तसंच रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालाचाही उल्लेख परमबीर सिंग यांनीही केला होता. ज्यामध्ये बदल्यांचं रॅकेट चालत असल्याचं रश्मी शुक्ला यांनी म्हटलं होतं तसंच काही फोन टॅपिंगही झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. राजकीय नेत्यांशी संबंध असलेले दलाल पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट चालवत आहेत असाही आरोप या अहवालात करण्यात आला होता.
ADVERTISEMENT