आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी अर्थात पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव बॅंकेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमसी बँकेचं यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ड्राफ्ट स्कीम जाहीर केली.
ADVERTISEMENT
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ड्राफ्ट स्कीमप्रमाणे पीएमसी बँकेची संपत्ती आणि दायित्व पूर्णपणे यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेचं असणार आहे. यात पीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणून या अटींचा समावेश विलिनीकरण करारात करण्यात आलेला आहे.
‘रेग्युलेटरी नियमांप्रमाणे स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यासाठी 200 कोटी रुपये असणे गरजेचं आहे. मात्र, युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचं भांडवल 1,100 कोटी रुपये इतकं आहे, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
ड्राफ्ट स्कीमप्रमाणे 1900 कोटी रुपयांचं इक्विटी वारंट (समभाग अधिपत्र) असून, ज्याचा वापर 8 वर्षांच्या कालावधीत कधीही करता येऊ शकणार आहे. हे इक्विटी वारंट (समभाग अधिपत्र) 1 नोव्हेंबर 2021 रोजी यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेसाठी जारी करण्यात आलेलं आहे.
रिझर्व्ह बँकेने या ड्राफ्ट स्कीमवर 10 डिसेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, पीएमसी बँकेत ज्या खातेदारांचे पैसे अडकून पडले आहेत. त्यांना त्यांचे पूर्ण पैसे मिळणार आहेत. पैसे अडकलेल्या पीएमसी बँकेच्या खातेदारांना पुढील तीन ते 10 वर्षाच्या कालावधीत पूर्ण पैसे परत मिळणार आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या ड्राफ्ट स्कीमनुसार यूनिटी स्मॉल फायनान्स बँक 5 लाखांची ग्यारंटेड रक्कम ठेवीदारांना देणार आहे. उर्वरित रक्कम बँक पुढील दोन वर्षात 50,000 हजार देईल. तीन वर्षाच्या अखेरीस बँकेकडून 1 लाख रुपये दिले जातील.
त्यानंतर चौथ्या वर्षाच्या शेवटी 3 लाख रुपये आणि पाच वर्षांनंतर साडेपाच लाख रुपयांची रक्कम बँकेकडून दिली जाणार आहे. त्यानंतर दहाव्या वर्षाच्या अखेरीस पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना राहिलेली उर्वरित सर्व रक्कम बँकेकडून अदा केली जाणार आहे.
ADVERTISEMENT