जगभरासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. नुकतंच रेमडेसिवीर या इंजेक्शनची वाढीव दराने विक्री करणाऱ्या दोन भावांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. तर आता गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना चाचणीचा बनावट रिपोर्ट देणार्या लॅब समोर आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केलीये.
ADVERTISEMENT
ही घटना पुण्यातील शिवाजीनगर भागात घडली असून एका लॅब मार्फत कोरोना चाचणीचा बनावट रिपोर्ट देणार्या दोघांना डेक्कन पोलिसांना जेरबंद करण्यात यश आलं आहे. मूळचा नांदेडचा सागर अशोक हांडे आणि दयानंद भिमराव खराटे असं या दोन आरोपींची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रोडवर असलेल्या एका लॅबमध्ये कोरोना तपासणीचे बनावट रिपोर्ट दिले जात असल्याची माहिती एका व्यक्ती मार्फत मिळाली. त्यानुसार तिथल्या लॅबमधील सागर अशोक हांडे आणि दयानंद भिमराव खराटे या दोघांना ताब्यात घेतलंय. त्या दोघांकडे चौकशी केली असता दोघांनीही अनेकांना बनावट रिपोर्ट दिल्याची कबुली दिलीये. तसंच आणखी काही जणं प्रकरणात सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक चौकशी सुरू आहे.
Remdesivir इंजेक्शन चढ्या दराने विकणाऱ्या दोन भावांना पुण्यात अटक
तर दुसरीकडे रेमडेसिवीर या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोन भावांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. प्रदीप देवदत्त लाटे (वय 25 ) हा 25 हजार रूपयांना एक इंजेक्शन विकतो आहे अशी माहिती मिळाली होती. प्रदीप लाटे हा मूळचा बालेवाडीतला आहे. मोटरसायकलवरून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन विकायला घेऊन आला. तेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या रॅकेटमध्ये प्रदीपचा भाऊ संदीप लाटे याचाही सहभाग आहे असंही निष्पन्न झालं.
ADVERTISEMENT