ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. त्याला 2 ऑक्टोबरला अटकही झाली. त्यानंतर पुढचे 25 दिवस तो तुरुंगात होता. 28 ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबरला तो तुरुंगाबाहेरही आला. तरीही शाहरुख खान आणि गौरी खान म्हणजेच आर्यनचे आई वडिल आर्यनच्या मानसिक आरोग्याबाबत त्याची खास काळजी घेत आहेत. अशात राहुल गांधी यांनी अभिनेता शाहरुख खानला पत्र लिहिलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबरला राहुल गांधी यांनी शाहरुख आणि गौरी या दोघांना एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानचं नाव आल्याने आणि तो या प्रकरणात अडकल्याने चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी आर्यन खान प्रकरण हा देशभरात चर्चेचा विषय होता.
काय होतं राहुल गांधी यांचं पत्र?
इंडिया टुडेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी शाहरुख खानला पत्र लिहिलं होतं. त्यात हा उल्लेख केला होता की ‘तुम्ही दोघेही कठीण काळातून जात आहात. जी परिस्थिती आत्ता तुमच्यावर ओढवली आहे त्याचं मला वाईट वाटतं आहे. शाहरुख तुमच्यासोबत तुमच्या असंख्य चाहत्यांनी मागितलेल्या दुवा आहेत. तुम्ही लोकांचं मनोरंजन करता त्यामुळे अनेक लोक तुमच्यासोबत आहेत मला आशा आहे की लवकरच आर्यन खान सुटेल आणि तुम्ही सगळे कुटुंबीय एकत्र याल.’ या आशयाचं पत्र राहुल गांधी यांनी शाहरुखला लिहिलं होतं असं समजतं आहे.
आर्यन खानच ड्रग्ज प्रकरणच नव्हे तर आत्तापर्यंत ‘या’ वादांमध्येही अडकलाय शाहरुख खान
आर्थर रोड तुरुंगात 28 दिवस घालवल्यावर आर्यन खानला जामीन मिळाला आणि त्याची तुरुंगातून सुटका झाली. आर्यन खानला एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. तसंच दर शुक्रवारी त्याला एनसीबी कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. या केसमध्ये अडकलेल्या इतर आरोपींसोबत त्याला कोणताही संपर्क करता येणार नाही. तसंच देश सोडूनही जाता येणार नाही. शहर सोडून कुठे जायचं असेल तर कोर्टाची संमती घ्यावी लागेल अशा अटी ठेवत बॉम्बे हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे. तसंच कोर्टात पासपोर्टही जमा कऱण्यास सांगितलं आहे.
आर्यन खानसोबतच या प्रकरणात अडकलेल्या अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही जामीन मिळाला आहे. आर्यन खानला 2 ऑक्टोबरला क्रूझ पार्टी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एनसीबीने त्याला अटक केली. त्याला या पार्टीचं निमंत्रण मिळालं होतं म्हणून तो या ठिकाणी पोहचला होता. अरबाझ मर्चंटकडे 6 ग्रॅम चरस सापडलं होतं. मात्र आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नव्हतं. एनसीबीने आर्यन खानची काही दिवस चौकशी केली. त्याच्या आणि अनन्या पांडेच्या व्हॉट्स अॅप चॅटवरून अनन्या पांडेचीही चौकशी झाली होती.
ADVERTISEMENT