Mumbai Airport अदानींकडे कसे गेले? राहुल गांधींनी सांगितली क्रोनॉलॉजी

मुंबई तक

07 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

Adani Group | Mumbai Airport : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंततराष्ट्रीय विमानतळाचे (chhatrapati shivaji maharaj international airport) व्यवस्थापन अदानी समूहाच्या (Adani Group) अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड या कंपनीकडे आहे. यापूर्वी ते जीव्हीके समूहाकडे होते. मात्र दोन वर्षांपूर्वी हे व्यवस्थापन अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले. पण हे तपास यंत्रणांचा वापर करुन जीव्हीके समूहावर दबाव टाकून झालं […]

Mumbaitak
follow google news

Adani Group | Mumbai Airport :

हे वाचलं का?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंततराष्ट्रीय विमानतळाचे (chhatrapati shivaji maharaj international airport) व्यवस्थापन अदानी समूहाच्या (Adani Group) अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड या कंपनीकडे आहे. यापूर्वी ते जीव्हीके समूहाकडे होते. मात्र दोन वर्षांपूर्वी हे व्यवस्थापन अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले. पण हे तपास यंत्रणांचा वापर करुन जीव्हीके समूहावर दबाव टाकून झालं असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना केला. (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport is managed by Adani Airport Holding Limited, a company of the Adani Group.)

लोकसभेमध्ये मंगळवारी (7 फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. यावेळी राहुल गांधी यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी सरकराने विमानतळ विकसीत करण्यासाठी दिले. नियम होता की, ज्यांना विमानतळ विकसीत करण्यासाठी द्यायचं आहे, त्यांना त्यातील अनुभव हवा. पण या नियमाला सरकारने बदललं. त्यावेळी माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली.

पण नियम बदलले आणि 6 विमानतळं अदानींना दिली. त्यानंतर नफ्यात सुरु असलेल मुंबई विमानतळही अदानींकडे गेलं. कसं? तर जीव्हीके ग्रुपविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन, त्यांच्यावर दबाव टाकून ते विमानतळ अदानींच्या हवाली केलं. याचा निकाल काय आला? तर आज 24 टक्के विमान वाहतूक अदानींकडे आहे. तर 31 टक्के मालवाहू विमान वाहतूक अदानींकडे आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

आणखी काय म्हणाले राहुल गांधी?

लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “मी पदयात्रा केली. यात्रेत मला असं काही ऐकायला मिळालं की, जे मी यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं. कारण आपल्या सगळ्यांमध्ये अहंकार असतो की, स्वतःचंच म्हणणं मांडायचं. जेव्हा आम्ही 500 ते 600 किमी चालून गेल्यानंतर लोकांचा आवाज आम्हाला ऐकायला यायला लागला.”

राहुल गांधी म्हणाले, “तरुण येत होते आणि सांगत होते की आम्ही बेरोजगार आहोत. आम्ही प्रश्न विचारायचो. कुणी म्हणायचं शिक्षण झालं, कुणी म्हणायचं गाडी चालवतो. शेतकरी भेटले. त्यांनी पंतप्रधान पीक विमाबद्दल सांगितलं. पैसे भरतो, पण पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांनीही असंही सांगितलं जमीन घेतली जाते पण योग्य मोबदला दिला जात नाही.”

“जमीन अधिग्रहण विधेयक लागू होत नाही. आदिवासी कायद्यानुसार जे दिलं जातं, ते आज हिसकावून घेतलं जात आहे, असं आदिवासींनी सांगितलं. मुख्य मुद्दा होता बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी. लोकांनी अग्निवीरबद्दलही सांगितलं.”

Rahul Gandhi Speech : अदाणींवरून मोदींना घेरलं! गांधींनी चढवला हल्ला

अग्रिवीर योजनेबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, “अग्निवीर योजना लष्कराची नाहीये, तर अजित डोवाल यांनी ती थोपवली आहे. लष्करातील लोक सांगत आहे की, हे आम्हाला हे नकोय. असा सूर उमटत आहे. राष्ट्रपतींच्या भाषणात खूप साऱ्या गोष्टी बोलल्या गेल्या, पण अग्निवीरबद्दल एकच ओळ होती. बेरोजगारी शब्द नव्हता. महागाई शब्द नव्हता. हे मला विचित्र वाटलं.”

राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, “मला एक नाव सगळीकडे ऐकायला मिळालं, ते होतं अदाणी. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र ते कश्मीर. फक्त अदाणी ऐकायला मिळालं. लोक विचारायचे की, हे अदाणी कोणत्याही क्षेत्रात जातात आणि यशस्वी ठरतात. ते कधी अपयशी ठरत नाही. तरुणांनी विचारलं की, हे काय आहे, आम्हालाही शिकायचं आहे. मोदींनी सांगितलं स्टार्टअप करा. आम्हालाही अदाणींसारखं व्हायचं आहे.”

“अदाणी हे कोणत्याही उद्योगात घुसतात. आधी एकदोन उद्योग करायचे. आता ते आठ ते दहा क्षेत्रात काम करतात. विमानतळ, डेटा सेंटर्स, सिमेंट, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, एअरोस्पेस आणि डिफेन्स, कंझ्युमर फायनान्स, पोर्ट… असाही प्रश्न विचारला की, अदाणींचं नेटवर्क 2014 पासून 2022 पर्यंत 8 बिलियन डॉलरवरून 140 बिलियन डॉलर कसं झालं? 2014 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी आली. त्यात ते 609 व्या क्रमांकावर होते”, असंही राहुल गांधी म्हणाले.

    follow whatsapp