मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण देवून शिंदे यांनी दुसऱ्या ठाकरे जवळ करण्याची रणनीती आखली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण?
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे जर दसरा मेळाव्याला व्यासपीठावर दिसले तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असे म्हणतं राज ठाकरे यांना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना दिले आहेत.
सरवणकर म्हणाले, जे कोणी हिंदुत्वासाठी एकत्रित आणण्याचे काम शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या पक्षांचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे नेते शिवसेनेच्या व्यासपीठावर आलेले आहेत. त्यामुळे हे नेते उद्या व्यासपीठावर दिसले तर त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
दसऱ्याला एकनाथ शिंदेंचा ‘दुसरा’ मेळावा?, सदा सरवणकरांचा शिवाजी पार्कसाठी अर्ज
राज ठाकरे – एकनाथ शिंदेमधील मधुर संबंध :
मागील काही दिवसांमधील घडामोडी बघितल्यास राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मधुर संबंध पाहायला मिळत आहेत. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज ठाकरे यांनी वारसा हा विचारांचा असतो, असे म्हणतं शिंदे यांच्या भूमिकेला छुपा पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली होती.
कल्याण : ‘मी शिवसेना बोलतेय’ देखाव्याला कोर्टाची परवानगी; गणेश मंडळाच्या लढ्याला यश
एकनाथ शिंदे गणपतीनिमित्त राज ठाकरेंच्या घरी :
याच घडामोडींदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून गणपतीला राज ठाकरे यांच्या घरी जावून भेट घेतली होती. तब्बल १० वर्षांनंतर शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. यापूर्वी 2012 मध्ये ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर बसविण्यासाठी मनसेची मदत मागण्यासाठी शिंदे राज ठाकरेंच्या घरी गेले होते.
ADVERTISEMENT