‘कपड्यावर जीएसटी लागल्यानंतर रणवीर सिंग’; अभिनेत्याच्या न्यूड फोटोशूटवरून मीम्सचा पूर

मुंबई तक

• 09:07 AM • 22 Jul 2022

अभिनेता रणवीर सिंग जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत राहतो, त्यापेक्षा जास्त चर्चा असते त्यांच्या फॅशन सेन्सची. यावेळी रणवीर सिंग सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने केलेलं न्यूड फोटोशूट! बॉलिवूडमधील उत्साही अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणवीर सिंगने मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलंय आणि त्यावरूनच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आलाय… बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी काहीतरी हटके गोष्टी करून […]

Mumbaitak
follow google news

अभिनेता रणवीर सिंग जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत राहतो, त्यापेक्षा जास्त चर्चा असते त्यांच्या फॅशन सेन्सची. यावेळी रणवीर सिंग सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने केलेलं न्यूड फोटोशूट! बॉलिवूडमधील उत्साही अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणवीर सिंगने मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलंय आणि त्यावरूनच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आलाय…

हे वाचलं का?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी काहीतरी हटके गोष्टी करून चाहत्यांचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. नेहमी वेगवेगळ्या वेशभूषा करणाऱ्या रणवीर सिंग यावेळी जे केलंय, त्याची कुणी कल्पनाही केली नसेल आणि त्यामुळेच लोक त्यावरून जोक करताहेत.

बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून रणवीर सिंगने स्वतःची ओळख निर्माण केलीये. अभिनय आणि आत्मविश्वासाच्या बळावर रणवीर सिंगने हे यश मिळवलंय. मोठा चाहता वर्ग असलेला रणवीर सिंग वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या जाहिरातीतही दिसतो, मात्र यावेळी त्याने पेपर मॅगझीनसाठी फोटोशूट केलंय. तेही न्यूड!

पेपर मॅगझीनने रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूटपैकी काही फोटो शेअर केले आणि सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले. रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, तर अनेकांना हसूच आवरेना.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरील व्हायरल मीम्स

रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूटवरून आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होतं असून, यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर व्यक्त होत आहे.

तुम्ही कपड्यांवरून हसत होता, आता काय कराल, असं एका यूजरने रणवीर सिंगचा फोटो शेअर करत म्हटलंय.

त्यानंतर एका यूजरने म्हटलं आहे की, अंघोळ करायचा कंटाळा आलेला तीन वर्षांचा मी. तर एक यूजरने फोटोशॉप करत त्याच्या अंगावर पांघरूण टाकलं आहे.

एका यूजरने रणवीर सिंगच्या गली बॉय चित्रपटातील गाण्यातील ‘तू नंगा ही तो आया है, क्या घंटा लेकर जायेगा?’ ओळी शेअर केल्या आहेत.

कार्पेटवर झोपलेल्या रणवीर सिंगचा न्यूड फोटो शेअर करत एकाने म्हटलंय की, कपड्यांवर जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर रणवीर सिंग.

रणवीर सिंगचं हे फोटोशूट बघून दीपिका पदुकोन काय म्हणाली असेल, असं सांगत चेन्नई एक्स्प्रेसमधील संवाद ‘पुरा नंगा होने किसने बोला था’ शेअर केलाय.

त्याचबरोबर काहींनी पाऊस सुरू असताना कारखाली झोपलेल्या कुत्रावरून मीम्स शेअर केलंय. तर काहींनी लाईट सुरू केल्यानंतर झुरळ असं दिसतं असं म्हटलंय.

राहुल खन्नानेही केलं होतं न्यूड फोटोशूट?

रणवीर सिंगने पेपर मॅगझीनसाठी केलेलं न्यूड फोटोशूटवरून चांगलीच चर्चा होतेय. यापूर्वी अभिनेता राहुल खन्नानेही न्यूड फोटोशूट केलं होतं. राहुल खन्नाच्या न्यूड फोटोवर मलायका अरोरापासून ते नेहा धुपियापर्यंत अनेक अभिनेत्रींनी मजेशीर कमेंट केल्या होत्या.

    follow whatsapp