ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

मुंबई तक

• 03:15 PM • 25 Feb 2021

कुष्ठरोग्यांच्या सेवेत आपलं आयुष्य अर्पण करणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या ७ दिवसांपासून डॉ. आमटे यांची प्रकृती खराब होती. ताप आणि खोकला कमी होत नसल्यामुळे डॉ. आमटे यांनी आपली कोरोनाची चाचणी करुन घेतली. सर्वातप्रथम डॉ. आमटे यांची RTPCR टेस्ट निगेटीव्ह आली. परंतू यानंतरही औषधोपचार आणि घेऊनही ताप व […]

Mumbaitak
follow google news

कुष्ठरोग्यांच्या सेवेत आपलं आयुष्य अर्पण करणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या ७ दिवसांपासून डॉ. आमटे यांची प्रकृती खराब होती. ताप आणि खोकला कमी होत नसल्यामुळे डॉ. आमटे यांनी आपली कोरोनाची चाचणी करुन घेतली. सर्वातप्रथम डॉ. आमटे यांची RTPCR टेस्ट निगेटीव्ह आली.

हे वाचलं का?

परंतू यानंतरही औषधोपचार आणि घेऊनही ताप व खोकला कमी होत नसल्यामुळे डॉ. आमटे यांचं आज चंद्रपुरात चेकअप करण्यात आलं. यावेळी झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये डॉ. आमटे यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. यानंतर डॉक्टरांनी प्रकाश आमटे यांना नागपुरातील रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होते आहे. दरम्यान आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची कोरोना चाचणी करवून घ्यावी असं आवाहन प्रकाश आमटे यांनी केलं आहे. डॉ. आमटे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय आमटे यांनी घेतला आहे.

    follow whatsapp