Maharashtra Budget Session: राऊतांच्या हक्कभंगावरून अजित पवार भडकले; विधानसभेत खडाजंगी!

मुंबई तक

02 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:14 PM)

Sanjay Raut Privilege Motion : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘हे विधिमंडळ नाही,तर हे चोरमंडळ आहे’ असे विधान केले होते. या विधानानंतर भाजप-शिवसेना सत्ताधाऱ्यांनी हक्क भंगाची (Privilege Motion) मागणी केली होती. ही मागणी मान्य होऊन समिती देखील गठित करण्यात आली होती. मात्र आज विधानसभेत या समितीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते […]

Mumbaitak
follow google news

Sanjay Raut Privilege Motion : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘हे विधिमंडळ नाही,तर हे चोरमंडळ आहे’ असे विधान केले होते. या विधानानंतर भाजप-शिवसेना सत्ताधाऱ्यांनी हक्क भंगाची (Privilege Motion) मागणी केली होती. ही मागणी मान्य होऊन समिती देखील गठित करण्यात आली होती. मात्र आज विधानसभेत या समितीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी आक्षेप नोंदवत, समिती पुर्नगठित करण्याची मागणी केली होती. या मागणी दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी रंगली होती.(sanjay raut privilege motion clashes between oppostion and rulers party in vidhan sabha)

हे वाचलं का?

अजित पवारांची मागणी काय?

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत हक्क भंगाच्या समितीसाठी गठित केलेल्या समितीवर प्रश्न उपस्थित केले. हक्कभंगाची नोटीस देणारे वादी आहेत आणि तेच समितीचे सदस्य म्हणून निर्णय घेतातय. त्यामुळे हे नैसर्गिक न्याय तत्वाला धरून होणार नाही, संसदीय कामकाज पद्धतीला धरून होणार नाही, त्यामुळे समिती पुर्नगठीत करावी अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे केली.

अतुळ भातखळकर, निलेश राणे आणि संजय शिरसाट यांनी आपली आपली भूमिका आधीच मांडली. तसेच जर मीच मांडलय आणि मीच समीतीत सद्स्य असेन, तर माझ मत तर स्पष्टच आहे. माझ काय मतं आहे ते मी रेकॉर्डला आणले होते.या गोष्टीचा आपण विचार करावा, असे अजित पवार म्हणालेत.

Sanjay Raut यांच्यावर आणलेला हक्कभंग प्रस्ताव नेमका आहे तरी काय?

समितीच्या प्रश्न उपस्थित करणे हा देखील हक्कभंग- शेलार

भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी अजित पवारांच्या समिती पुर्नगठीत करण्याच्या मागणीचा विरोध केला. समितीची नियुक्ती 100 टक्के कायदेशीर आहे. यात बेकायदेशीर काहिच नाही, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

आशिष शेलार (Ashish Shelar) पुढे म्हणाले,आपण कुठल्याही सदस्याचा अधिकार, तो इथे बोलला म्हणून समितीवर जाण्याचा काढू शकत नाही. तो समितीचा सदस्य आहे म्हणून त्याचा विशेष हक्क भंगाच्या नोटीस देण्याच्या अधिकार तो केवळ समीतीत आहे म्हणून तोही आपल्याला काढता येत नाही. तसेच हक्कभंग समितीचा तो अध्यक्ष असताना, त्याने करायच्या कामाबद्दलची स्पष्टता आहे. या सभागृहाचा सद्स्य असताना त्याला त्याचा हक्कभंग झाला किंवा त्याला वाटलं कुणाचा हक्कभंग झाला, म्हणून त्याबाबतीत स्वत:च मत मांडण्याचा संपुर्ण अधिकार सरंक्षित आहे.

Sanjay Raut Controversy: भाजप-शिवसेना आमदार खवळले! राऊतांविरुद्ध हक्कभंग

या सभागृहात सदस्य त्यावेळी बोलले, त्यांना माहित नव्हत ते हक्कभंग समितीचे सदस्य बनणार आहेत.आणि जर समीतीचे सदस्य बनले, तर ते कॉझी ज्यूडिशस म्हणून काम करताना, त्यांना जे अपेक्षित कॉझी ज्यूडिशस पद्धतीने काम करणे आहे. ते करायला ते अपात्र आहेत. जे सदस्य त्या ठिकाणी गेले आहेत ते कॉझी ज्यूडिशस आणि कॉझी ज्यूडिशस माईंडने काम करणार नाही, असे अभिप्रेत वाटाव आणि ते मांडण हा देखील एक हक्कभंग आहे, अशी आठवण शेलार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) करून दिली.

    follow whatsapp